AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिनाक्षी नटराजन यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज बाद, मुंबईत आंदोलन पेटलं, पोलीस अन् काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने

काही तांत्रिक कारणामुळे मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या राज्यसभेच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने बाद केला आहे. त्यानंतर आता मुंबईमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत.

मिनाक्षी नटराजन यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज बाद, मुंबईत आंदोलन पेटलं, पोलीस अन् काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने
मुंबईत काँग्रेसचं आंदोलन Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 10, 2026 | 6:14 PM
Share

राज्यसभेची निवडणूक काँग्रेसकडून पूर्ण ताकदीने लढवली जात आहे. मात्र या निवडणुकीत काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे, तो म्हणजे काँग्रेसच्या उमेदवार  मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाकडून बाद ठरवण्यात आला आहे. काही तांत्रिक कारणांमुळे उमेदवारी अर्ज बाद करण्याचं आल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. मीनाक्षी नटराजन या काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जातात, त्यामुळे हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर आता काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. मुंबईमध्ये काँग्रेसच्या वतीने निवडणूक आयोगाविरोधात आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

मुंबतील टिळक भवनसमोर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. या आंदोलनादरम्यान पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. यावेळी पोलिसांकडून बॅरिगेंटिग करून या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला.

मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे हे आंदोलन सुरू आहे. मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज काही तांत्रिक कारणामुळे बाद झाल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं आहे, मात्र हे कारण आम्हाला मान्य नसल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. त्यामुळे आता वातावरण चांगलंच तापलं असून, काँग्रेसच्या वतीने आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

मिनाक्षी नटराजन यांनी काँग्रेसच्या वतीने आपला राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी मध्य प्रदेशमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यानंतर या अर्जावर भाजपकडून अक्षेप घेण्यात आला, मिनाक्षी नटराजन यांनी आपल्या विरोधातील तक्रारीची माहिती या अर्जात दिली नसल्याचा दावा भाजपच्या वीतने करण्यात आला होता, त्यानंतर हा उमेदवारी अर्ज बाद झाला. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे, त्यामुळे काँग्रेस आता चांगलीच आक्रमक बनली आहे.

Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप