प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! उद्या तिन्हीही मार्गांवर मेगाब्लॉक, थेट पूर्णवेळ…

Mumbai Local Mega Block : उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्याअगोदर मेगाब्लॉकचा वेळ जाणून घेणे महत्वाचे आहे. तिन्ही मार्गांवर उद्या म्हणजेच रविवारी मेगाब्लॉक आहे. ज्यामुळे प्रवाशांचे उद्या हाल होण्याची शक्यता आहे.

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! उद्या तिन्हीही मार्गांवर मेगाब्लॉक, थेट पूर्णवेळ...
Mumbai local
| Edited By: | Updated on: Dec 13, 2025 | 9:56 AM

लोकल प्रवाशांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्याअगोदर मेगाब्लॉकचा वेळ जाणून घेणे महत्वाचे आहे. तिन्ही मार्गांवर उद्या म्हणजेच रविवारी मेगाब्लॉक आहे. ट्रान्स-हार्बरवरील सर्व सेवा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी कामांसाठी उद्या, रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे लाखो प्रवाशांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. काही वेळ गाड्या पूर्णपणे बंद ट्रान्स-हार्बर असतील. ​ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत सेवा पूर्णपणे रद्द राहणार आहे.

​मध्य रेल्वेवर परिणाम: माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत ब्लॉक राहील. या वेळेत जलद लोकल या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. धीम्या आणि जलद लोकल यादरम्यानच्या काळात एकाच मार्गावरून धावतील. मेगाब्लॉकचा परिणाम पश्चिम रेल्वेवर होणार आहे. पश्चिम रेल्वेनेही मेगाब्लॉक जाहीर केला.

पश्चिम रेल्वेवर परिणाम: बोरिवली ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या वेळेत धीम्या लोकल जलद मार्गावर धावतील आणि काही लोकल रद्द राहतील. तर ब्लॉकदरम्यान बोरिवली स्थानकावरील फलाट क्रमांक 1 ते 4 पूर्णपणे बंद राहणार आहेत. विशेषता ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे वाशी नेरूळदरम्यान सर्व लोकल सेवा पूर्णपणे रद्द राहणार आहेत. यादरम्यान एकही लोकल धावणार नाही.

लोकलसेवा पूर्णपणे बंद असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. प्रवाशाची गैरसोय होऊ नये यासाठी प्रवाशाने वेळापत्रक पाहून आपला प्रवास करावा पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तिन्ही रेल्वे मार्गांवर ब्लॉक असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार हे स्पष्ट आहे.