AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जितेंद्र आव्हाड यांचं टेन्शन वाढलं, शिवसेना पक्ष प्रवेशाच्या चर्चेवर MIM नेता असं काय म्हणाला?

एमआयएम नेते युनूस शेखर यांनी शिवसेना पक्ष प्रवेशाची चर्चा फेटाळून लावली आहे. त्यानंतर त्यांनी मुंब्रा विधानसभेत निवडणूक लढणार असल्याचेही म्हटलं.

जितेंद्र आव्हाड यांचं टेन्शन वाढलं, शिवसेना पक्ष प्रवेशाच्या चर्चेवर MIM नेता असं काय म्हणाला?
yunush shaikh news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 15, 2026 | 2:50 PM
Share

मुंब्र्यातील एमआयएमची नगरसेविका सहर शेखचे वडील युनूस शेख यांची शिंदे गटाच्या एका शाखेच्या कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. युनूस शेख यांच्या नियुक्तीने त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्याची चर्चा पसरली. आता यावर स्वत: युनूस शेख यांनी पक्ष प्रवेशाच्या चर्चेवर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला नसल्याचे म्हटलं. यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याचेही सांगितलं.

युनूस शेख म्हणाले, ‘मी शिवसेनेत प्रवेश केला नाही. ही शिवसेनेची एक शाखा आहे. माझा चाळीस वर्षांपासून व्यवसाय आहे. माझा इंटरनेट आणि केबलचा हा व्यवसाय आहे. अखिल भारतीय केबल सेना असे या संस्थेचे नाव आहे. यात सर्व व्यावसायिक सभासद आहेत. मी देखील या संस्थेत आहे. मला आता कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रात अध्यक्ष म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. आता या भागातील केबल ऑपरेटरला सोबत घेऊन संघटन मजबूत करायचं आहे’.

पक्षीय भूमिकेवर भाष्य करताना युनूस शेख म्हणाले, ‘आमचा वेगळा पक्ष आहे. पक्ष वाढवण्यासाठी माझी मुलगी, मुंब्रा हिरवा करू, असे म्हणाली होती. मुंब्रा आहे तर हिरवा करू.  ठाणे असेल तर भगवा करू. यात चुकीचं काय? खरंतर मी शिवसेनेत प्रवेश केलेला नाही. मला पक्षप्रवेश करायचा असता तर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला असता. पक्षात जायचं असेल, नियुक्ती पत्र घेतलं असतं. मला शिवसेना वाढवायची गरज आहे. ती स्वत:हून वाढत आहे. त्यांचं काम पाहून आमदार-खासदार प्रवेश करत आहेत. मी शिवसेनत प्रवेश केल्याने पक्ष मजबूत होईल, असे म्हणणे उचित नाही. एकनाथ शिंदेंची शिवसेना आपोआप वाढू लागली आहे. त्यांना आमची गरज नाही. परंतु या नियुक्तीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जिंतेद्र आव्हाड यांना फटका बसेल. त्यावेळी ठरलं होतं. मी मुंब्र्यातून लढणार आहे’.

‘मुलीने मला माझ्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. केबल ऑपरेटर्सच्या अनेक समस्या आहेत. मी माझ्या विभागातील लोकांच्या समस्या सोडवेल. ही वेगळी संघटना आहे. खरंतर ही व्यावसायिक संघटना आहे. या संघटनेत गेल्या अनेक वर्षांपासून आहे. आता फक्त संघटनेत पद दिलं आहे. आता लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजे. निधी आणल्यानंतर लोक जोडले जातील. आता फंडसाठी शिवसेना, भाजपकडे जाण्याची वेळ आली,तर आम्ही जाणार, असे त्यांनी स्पष्ट केले.

Follow Us
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...