Chhagan Bhujbal : छगन भुजबळ रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल
CHHAGAN BHUJBAL HOSPITALISED
| Edited By: | Updated on: Oct 28, 2025 | 10:57 PM

Chhagan Bhujbal Admitted To Hospital : राज्याचे अन्न व नागरी पुरवठवामंत्री छगन भुजबळ यांना तातडीने रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार  नियमित चाचण्यांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

नियमित चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल

भुजबळ यांना रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्यांच्या प्राथमिक चाचण्या केल्या आहेत. या चाचण्यांतून मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर पुढील निर्णय घेतील. भुजबळ यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही, असे सांगण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

मराठा आरक्षणाच्या जीआरला भुजबळ यांचा विरोध

गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयाला विरोध केलेला आहे. या जीआरमुळे राज्यभरातील ओबीसींचे नुकसान होणार आहे, असा दावा त्यांनी केलाय. विशेष म्हणजे त्यांनी नुकतेच राज्यभरातील ओबीसींना एकत्र येण्याचे आवाहन करून आरक्षण वाचवण्यासाठी बीडमध्ये महाएल्गार सभेचे आयोजन केले होते. या सभेला राज्यातील हजारो ओबीसी बांधव उपस्थित होते.  या सभेत छगन भुजबळ यांनी जोरदार भाषण केले होते. तसेच आता आरक्षण वाचवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते.

भुजबळ विरुद्ध जरांगे

भुजबळ यांच्या या भूमिकेमुळे मराठा आरक्षणासाठी झटणारे मनोज जरांगे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. भुजबळ यांनी जीआरला थेट विरोध केल्यामुळे जरांगे भुजबळ यांच्यावर टीका करताना पाहायला मिळतात. ओबीसींच्या महाएलल्गार सभेत भुजबळ यांनी मराठा आरक्षणावर थेट आक्षेप व्यक्त केला होता. तसेच त्यांना माझा इतिहास माहिती नाही, असे सांगत ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी भविष्यात मोठा लढा उभारू, असे सूतोवाच केले होते. असे असतानाच आता भुजबळ यांची प्रकृती बिघडली आहे. सध्या ते रुग्णालयात आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.