भाजप-मनसे युतीबाबत नाशिकमध्ये मंत्री दानवेंचे सूचक वक्तव्य; राज्यातल्या हिंसाचारामागे मोठी शक्ती असल्याचा दावा

सरकारमधील मंत्र्यांचे नातेवाईक ड्रग माफियाच्या धंद्यात आहेत. चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दबाव आणणे सुरू आहे. खरे तर विधानसभा निवडणुकीत आम्हाला जनतेने स्पष्ट कौल दिला. मात्र, राज्यात दगाफटका करून अमर अकबर अँथनीचे सरकार आले आहे, अशी टीका दानवे यांनी केली.

भाजप-मनसे युतीबाबत नाशिकमध्ये मंत्री दानवेंचे सूचक वक्तव्य; राज्यातल्या हिंसाचारामागे मोठी शक्ती असल्याचा दावा
रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 6:07 PM

नाशिकः केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी नाशिकमध्ये जोरदार राजकीय टोलेबाजी केली. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेसोबतची युती असो की, राज्यातले सरकार. त्यांनी केलेली चौफेर टोलोबाजी ऐकुण उपस्थितांमध्येही चांगलीच खसखस पिकली.

मंत्री रावसाहबे दानवे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जोपर्यंत परप्रांतीयांच्या मुद्द्याबाबत बदल करत नाही, तोपर्यंत मनसे-भाजप युती शक्य नाही. यावेळी त्यांनी राज्य सरकारला चांगलेच घेरले. या सरकारमधील मंत्र्यांचे नातेवाईक ड्रग माफियाच्या धंद्यात आहेत. चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दबाव आणणे सुरू आहे. खरे तर विधानसभा निवडणुकीत आम्हाला जनतेने स्पष्ट कौल दिला. मात्र, राज्यात दगाफटका करून अमर अकबर अँथनीचे सरकार आले. या राज्यातली जनता सरकारवर नाराज असल्याने, 2024 मध्ये भाजप स्वतंत्र लढून तिन्ही पक्षांना चारी मुंड्या चित करेल असा दावा करायलाही ते विसरले नाहीत.

राज्यात उसळलेल्या हिंसाचारावर बोलताना दानवे म्हणाले, अतिक्रमण काढावे, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. त्रिपुरामध्ये मशिद पडली. मात्र, त्याचे पडसाद मालेगाव, अमरावतीमध्ये कसे, त्यांच्या मागे एखादी शक्ती आहे. खरे तर संजय राऊत यांचा आढावा घ्यायचा असेल, वेगळी प्रेस घ्यावी लागेल. सुधीर मुनगंटीवार यांची क्लिप आपण बघितली, पण उद्धव ठाकरे यांची देखील क्लिप बघा. ते म्हणतात, आमच्या राज्यात एकही संप होणार नाही. अन्यथा आमचा मंत्री जाऊन समाधान काढेल. त्या क्लिपची देखील दखल घेतली पाहिजे.

रेल्वेचे खासगीकरण होणार नाही, अशी हमी देताना ते म्हणाले की, कर्मचाऱ्यांचे कुटुंब शासनाच्या दारात बसून मागण्या मागत आहेत. मात्र, सरकारकडून समाधानकारक चर्चा नाही. तांत्रिक बाबी तपासाव्यात. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या सवलती एसटी कर्मचाऱ्यांना मिळाव्यात. धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती दिल्या. तसंच एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या सवलती द्याव्या, असा सल्ला त्यांनी दिला. शेतकरी प्रश्नांवर दानवे म्हणाले, राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी भाजप कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यात गेले. त्यांनी शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेतल्या. सरकारने दोन वेळेस पंचनामे केले, पण मदत मिळाली नाही. दुष्काळ जाहीर केलाच नाही. शेतकऱ्यांना विमा देखील मिळाला नाही. अहो, मेडिकल परीक्षांच्या 2-3 तारखा जाहीर झाल्या. दिलेल्या तारखेला शाळा देखील सुरू केल्या नाहीत. या सरकारचे काय सांगावे, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

98 टक्के रेल्वे सेवा सुरू

मंत्री दानवे म्हणाले, कोविडच्या पूर्वी चालणाऱ्या गाड्या पूर्ववत सुरू करण्यात येणार आहेत. स्पेशल ट्रेन आता सामान्य ट्रेन झाल्या आहेत. त्यानुसार कोविडपूर्वीची भाडे आकारणी केली जाणार आहे. सध्या 98 टक्के रेल्वे सेवा सुरू केली आहे. स्पेशल ट्रेनच्या गाड्यांचे नंबर पूर्वीप्रमाणे देण्यात आले आहेत. मात्र, पूर्वीचा प्रोटोकॉल पळून जनतेने रेल्वेचा प्रवास करावा लागेल, असे आवाहन त्यांनी केले. (Minister Danve’s big statement about BJP-MNS alliance in Nashik; Claims to be a major force behind the violence in the state)

इतर बातम्याः

मोठी बातमीः OBC Political Reservation बाबत राज्य सरकार सकारात्मक, इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी देणार निधी

ST Strike: परिवहन मंत्र्यांसोबतची बैठक सकारात्मक; कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार, पुन्हा एक चर्चेची फेरी

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.