AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमीः OBC Political Reservation बाबत राज्य सरकार सकारात्मक, इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी देणार निधी

राजकीय आणि सामाजिक क्षेत्र ढवळून काढणारी एक मोठी बातमी. बहुचर्चित अशा ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे.

मोठी बातमीः OBC Political Reservation बाबत राज्य सरकार सकारात्मक, इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी देणार निधी
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 5:27 PM
Share

मुंबईः राजकीय आणि सामाजिक क्षेत्र ढवळून काढणारी एक मोठी बातमी. बहुचर्चित अशा ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी आता टप्प्या-टप्प्याने निधी देणार जाणार असल्याचे समजते.

ओबीसींचे राजकीय आरक्षण ही अतिशय महत्त्वाची आणि चर्चेत असणारी बातमी. यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील मतमतांतरे आणि आरोप-प्रत्यारोप सर्वश्रुत आहेत. ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर दबाव वाढत आहे. मात्र, ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा एकदा मिळवून देण्यासाठी इम्पेरिकल डेटाची आवश्यकता असल्याचे महाराष्ट्र सरकारचे म्हणणे आहे. त्यात या सध्याच्या साऱ्या चिघळलेल्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात सकारात्मक असल्याचे वृत्त आहे. याबाबत येत्या 18 तारखेला पुण्यात मागासवर्गीय आयोगाची अध्यक्ष आणि सदस्यांची एकत्रित बैठक आहे. या बैठकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत अतिशय महत्त्वाचा असा इम्पेरिकल डेटा गोळा करण्याबाबत राज्य सरकार टप्प्या-टप्प्याने निधी देणार असल्याचा निर्णय होऊ शकतो. त्यानंतर आठवडाभरात हा इम्पेरिकल डेटा गोळा करायला सुरुवात होण्याची शक्यता आहे. हा निर्णय झाल्यास महाविकास आघाडी राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत एक पाऊस पुढे टाकले आहे, यावर शिक्कामोर्तब होईल.

इम्पेरिकल डेटा म्हणजे काय?

एखाद्या विषयाबद्दल निष्पक्ष अशी तथ्यावर आधारित माहिती गोळा करायची असेल. आणि जिथे लोकांची मते, दृष्टिकोनाचा प्रश्न येत नाही. ठोस अशा माहितीच्या आधारावर ही तथ्ये गोळा केली जातात त्यालाच राज्यशास्त्राच्या भाषेत इम्पेरिकल डेटा म्हणतात. ही माहिती गोळा करण्यासाठी प्रत्यक्ष सर्वेक्षण, जनगणना, बाजारपेठेची आकडेवारी आदींचा आधार घेतला जातो. हा डेटा केंद्र सरकारकडे आहे. मात्र, त्यांनी राज्य सरकारला द्यायला नकार दिला आहे. विशेष म्हणजे हा डेटा केंद्राचा की राज्याचा विषय यावरून पूर्वीच आरोप-प्रत्यारोप रंगले होते. आता राज्य सरकारने स्वतः पुढाकार घेत हा डेटा गोळा करण्याची पावले उचलण्याची भूमिका घेतल्याचे समजते. दरम्यान, सध्या राज्यात येत्या फेब्रुवारी महिन्यात महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्यापूर्वीच राज्य सरकार ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत आग्रही झाल्याचे दिसते आहे. (The state government will provide funds in stages to collect positive, imperial data on the political reservation of OBCs)

इतर बातम्याः

ST Strike: परिवहन मंत्र्यांसोबतची बैठक सकारात्मक; कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार, पुन्हा एक चर्चेची फेरी

मालेगावमध्ये पोलिसांची अतिरिक्त कुमक, पोलीस अधीक्षकांची माहिती; आमदारांकडून सूत्रधाराच्या अटकेची मागणी

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.