त्यांची काहीतरी अडचण असेल… सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर मंत्री गिरीश महाजन यांचे मोठे विधान…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. आज अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. शरद पवार यांनी यावर म्हटले की, आपल्याला याबाबतची कल्पना नाही. गिरीश महाराज यांनी याबाबत मोठे विधान केले.

त्यांची काहीतरी अडचण असेल... सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर मंत्री गिरीश महाजन यांचे मोठे विधान...
Girish Mahajan
| Edited By: | Updated on: Jan 31, 2026 | 9:43 AM

मुंबईहून बारामतीकडे जात असताना अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. बारामती विमानतळाच्या धावपट्टीच्या शेजारी अपघात झाला. अजित पवार यांच्यासह 5 जणांचे या अपघातात निधन झाले. अजित पवार यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. या विमान अपघाताची सध्या चाैकशी केली जात आहे. अजित पवार यांचे निधन झाले यावर अजूनही लोकांचा विश्वास बसत नाही. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होते. अजित पवार यांच्या निधनानंतर काल काही विधी सुरू होते, त्यावेळी सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबद्दल चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर शरद पवार यांच्यासोबत कोणतीही चर्चा न करता सुनेत्रा पवार या थेट मुंबईत दाखल झाल्या. आज पक्षाची 5 वाजता बैठक असून सुनेत्रा पवार या 5 वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले की, हा प्रश्न राष्ट्रवादीचा आहे. तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य असेल असे मुख्यमंत्र्यांनी काल त्यांना सांगितलं आहे. आम्हाला काही अडचण नाही. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला खूप घाई होत असलेल्या प्रश्नावर उत्तर देत महाजनांनी म्हटले की, काही तांत्रिक अडचण किंवा रणनीती असेल, त्यामुळे दुसऱ्या दिवशी हा निर्णय घेतलाय.

घाई होते आहे की नाही याबाबत मी काय बोलावे. त्यांची काही तरी अडचण असेल, काही तरी कारण असेल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर गिरीश महाजन यांनी म्हटले की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आमचा विषय नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आनंदच, आम्हाला कुठली अडचण नाही. सुनेत्रा वाहिनी आणि त्यांनी ठरवावे. त्यांनी ठरवावे काय करायचे

एकत्र होण्याबाबत काही असत तर त्यांनी बोलावलं असत. धावपळीत छोटे खाणी कार्यक्रम आहे, सर्वांनाच बोलावले नाही, मी जाणार आहे, असेही गिरीश महाजन यांनी म्हटले. अजित पवार यांच्या निधनाच्या काही तासात सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मात्र, शरद पवार यांच्यासोबत कोणतीही चर्चा न करता सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल झाल्या आहेत.