AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“बीड जिल्हा देवेंद्र फडणवीसांसाठी लकी…”, पंकजा मुडेंनी सांगितलं खास कनेक्शन

"आज तरी शासन देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे मंत्री आहे. तेव्हा मी आले. तुम्ही घरगुती कार्यक्रमाला बोलावलं तर येईल. हा सरकारी कार्यक्रम आहे. बॅनरवर फोटो आहे का हे मी पाहिलं नाही. शेतकऱ्यांचा कार्यक्रम आहे." असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. 

बीड जिल्हा देवेंद्र फडणवीसांसाठी लकी..., पंकजा मुडेंनी सांगितलं खास कनेक्शन
pankaja munde devendra fadnavis
| Updated on: Feb 05, 2025 | 3:17 PM
Share

बीडमधील आष्टी उपसा सिंचन योजना क्र. 3 अंतर्गत येणार्‍या शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी आज करण्यात आली. तसेच यातील बोगदा कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांसह आष्टीचे आमदार सुरेश धस, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. यावेळी पंकजा मुंडेंनी जोरदार भाषण केले. त्यात त्यांनी बीड जिल्हा देवेंद्र फडणवीसांसाठी लकी आहे, असे म्हणत बीड जिल्ह्याचे आणि देवेंद्र फडणवीसांचे खास कनेक्शन सांगितले.

बोलणं एक आणि करणं एक माझ्या रक्तात नाही

देवेंद्रजी एक किस्सा आठवला. तुम्ही जेव्हा सीएम म्हणून बाहुबली म्हणतात. तुम्ही ज्येष्ठ आहात. नेते आहात. तुम्ही कॅबिनेटचे प्रमुख आहात. तुमच्या विषयी आदरभाव नेहमी येतो. पण आज ममत्व भाव येतोय. कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत. काही वर्षापूर्वी मला शिवगामीणी म्हणत होते. शिवगामीणी ही बाहुबलीची आई आहे. त्यामुळे तुम्हाला बघताना मला आज वेगळाच भाव आला. शिवगामीचं वाक्य असतं, सुरेश अण्णा तुम्ही जसे पिक्चर म्हणता. आम्हीही पिक्चरचे वाक्य म्हणतो. शिवगामीणीचं वाक्य असतं, मेरा वचनही है मेरा शासन. आणि जे जाहीर वचन सुरेश धस यांना दिलंय. तेच माझं शासन आहे. गोपीनाथ मुंडेची लेक आहे. बोलणं एक आणि करणं एक माझ्या रक्तात नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

“सुरेश धसांनी आवर्जून उल्लेख केला. २००३मधला उल्लेख केला. देवेंद्र जी फडणवीस आपण कदाचित ज्यांना लहानपणापासून पाहत आला. महाजन आणि मुंडेंचा किस्सा सांगितला. अण्णा मी तुम्हाला अण्णा म्हणते बरं का? तुम्ही ताईसाहेब म्हणत नाही. जशाला तसं आहे आपलं प्रेमाचं नातं. इज्जत आम्हीही देतो. पण मला आनंद वाटला. तुम्ही २००३चा उल्लेख केला. मुख्यमंत्री महोदय मी तुम्हाला आठवण करून देतो. या ठिकाणी सैनिकी छावणी होण्याचा प्रस्ताव जॉर्ज फर्नांडिस असताना झाला. यावेळी प्रमोद महाजन यांना गोपिनाथ मुंडे यांनी २००३च्या जानेवारीत पत्र दिलं. आणि १९ फेब्रुवारी २००३ जॉर्ज फर्नांडिस यांना पत्र दिलं. हे ४० गावं माझी आहेत. इथं सैनिकी छावण्या करू नका. इथे शेती आहे. बागायती आहे. उपसा जलसिंचन योजना करा, असं त्या पत्रात म्हटलं होतं. सुरेश धस यांनी त्याचा आवर्जुन उल्लेख केला, अशी आठवणही पंकजा मुंडेंनी करुन दिली.

“हा सरकारी कार्यक्रम”

“आपल्या जिल्ह्यातील नागरिकांसाठी भूमिका घेताना मागे पुढे पाहायचं नाही ही गोपीनाथ मुंडे यांची भूमिका होती. आजच्या कार्यक्रमाला मी येणार की नाही अशी चर्चा होती. का नाही येणार? सुरेश अण्णा तुम्ही आपल्या जयदत्तचं लग्न केलं. तेव्हा साडी आणि पत्रिका घेऊन आला होता. सागरचं लग्न कराल तेव्हा बोलावलं तर येईल, नाही तर नाही येणार. पण हा कार्यक्रम शासनाचा आहे आणि आज तरी शासन देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे मंत्री आहे. तेव्हा मी आले. तुम्ही घरगुती कार्यक्रमाला बोलावलं तर येईल. हा सरकारी कार्यक्रम आहे. बॅनरवर फोटो आहे का हे मी पाहिलं नाही. शेतकऱ्यांचा कार्यक्रम आहे.” असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

“बीड जिल्हा लकी”

“बीडमध्ये सहापैकी पाच आमदार निवडून येतात. तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता. बीड जिल्हा लकी आहे. २०१९मध्ये बीडमध्ये सहा पैकी पाच आमदार निवडून आले. आता आमचे आमदार निवडून आले. अजितदादांचे आमदार आपल्यासोबतच आहे. आज अजितदादा पालकमंत्री आहेत. ते आपल्याला नेहमी सहकार्य करतील.  जनतेसाठी आम्ही कधीच भेदभाव करणार नाही. पालकमंत्री असताना कधी सुईच्या टोकाएवढाही भेदभाव केला नाही. आम्ही काम करत राहिलो”, असे पंकजा मुंडेंनी म्हटले.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.