AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘एसटी कर्मचाऱ्यांचा गणेशोत्सव तोंडावर असताना संप हे कितपत योग्य?’, मंत्री उदय सामंत यांचा सवाल

राज्यभरात गणेशोत्सवाचा आनंद आहे. येत्या शनिवारी गणरायाचं आगमन होणार असल्याने गणेशभक्त आपापल्या गावी जात आहेत. यासाठी एसटी बसचा सर्वाधिक वापर केला जातो. पण ऐन गणेशोत्सव तोंडावर असताना एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप कितपत योग्य आहे? असा प्रश्न मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.

'एसटी कर्मचाऱ्यांचा गणेशोत्सव तोंडावर असताना संप हे कितपत योग्य?', मंत्री उदय सामंत यांचा सवाल
मंत्री उदय सामंत
| Updated on: Sep 03, 2024 | 4:53 PM
Share

एसटी कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्यांसाठी संपाचं हत्यार उपसण्यात आलं आहे. गणेशोत्सव तोंडावर असताना एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. यानंतर मंत्री उदय सामंत यांची एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना गणेशोत्सव असल्याने संप मागे घेण्याची विनंती केली. “सरकार आपल्या निर्णाबाबत सकारात्मक आहे. त्यामुळे आपणही गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही, यासाठी संप मागे घ्या, असं आवाहन उदय सामंत यांनी केलं. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार नक्की सकारात्मक होतं, आहे आणि भविष्यातही कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये हीच भूमिका सरकारची राहिलेली आहे”, अशी भूमिका उदय सामंत यांनी मांडली.

“सरकारला सांगताना आनंद होतोय की, एसटी महामंडळाबाबत जे काही निर्णय घेतले गेले, त्यामध्ये महिलांसाठी अर्धतिकीट असेल, 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना मोफत प्रवास असेल, यामुळे जो डिफरन्स आहे, तो शासनाने द्यायला सुरुवात केली, आणि गेले कित्येक वर्ष एसटी महामंडळ जे थोडंफार मागे वाटत होतं त्याचं नुकसान भरण्यात आम्ही थोडंफार यशस्वी झालो. सगळच एसटी महामंडळ नफ्यामध्ये आलं आहे, असा माझा दावा नाही. पण या योजनांमुळे एसटी महामंडळाला बऱ्यापैकी शासनाकडून निधी उपलब्ध होतोय, हे देखील सगळ्या संघटनांना सांगितलं”, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

कर्माचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचं पत्र घेतलं नाही?

“नवीन गाड्यांच्या बाबतीतही संघटनांशी चर्चा झाली. पण याचा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. मुख्यमंत्र्यांनी उद्या सात वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकीचं पत्र देण्याचा प्रयत्न आम्ही आंदोलक कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे डेपोतील जे कर्मचारी असतात, त्यांच्याशी चर्चा करुन निर्णय देतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी देत बैठक संपली”, अशी माहिती सामंत यांनी दिली.

‘गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन कितपत योग्य?’

“मुख्यमंत्र्यांकडेच परिवहन विभाग आहे. त्यांच्या सूचनेनुसारच मी एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. अनेक वेळा, चार वर्षापूर्वीच्या संपातही माझ्या सारख्याच कार्यकर्त्याने मध्यस्थीची भूमिका घेतली होती. आजदेखील तशी भूमिका घेण्याचा मी प्रयत्न केला. मला एक गोष्ट समजत नाही. गणपती उत्सव हा इतका मोठ्या ताकदीचा उत्सव साजरा केला असतो. असं असताना अशा प्रकारचं आंदोलन होणं हे कितपत योग्य आहे, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे”, असं मंत्री उदय सामंत म्हणाले.

“मी त्यांना विनंती केली की, सरकारमधील मुख्यमंत्री तुमच्यासोबत बैठक घेण्याबाबत पत्र देतात, त्यामध्ये खरेपणा आहे. उद्या मुख्यमंत्री तुमच्यासोबत बैठक घेतील तेव्हा चर्चा करा. तुमच्या प्रश्नांवर नक्की सकारात्मक निर्णय होईल, अशाप्रकारची भूमिका मी त्यांच्यापुढे मांडली. आमचे सहकारी आमदार सदाभाऊ खोत किंवा आमदार गोपीचंद पडळकर असतील, त्यांच्यासोबतही मी चर्चा करणार आहे. जेणेकरुन गणेशोत्सवात कोणत्याही नागरिकाला जाण्या-येण्यास त्रास होऊ नये, ही सरकारची भूमिका आहे”, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

“एसटी कर्मचारी कायम स्वरुपी आनंदात असला पाहिजे ही भूमिका एकनाथ शिंदे यांची आहे. या सगळ्या प्रकरणात मी देखील मध्यस्थी करतो असं सांगितलं होतं. मी सर्वांना ओळखतो. त्यांनी जनतेचा विशेषत: गणेश भक्तांचा विचार करावा, ही माझी विनंती आहे”, असं आवाहन उदय सामंत यांनी केलं.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.