राष्ट्रवादीत घरवापसीचं सत्र, जयंत पाटलांच्या उपस्थितीत माजी महापौरांच्या हाती पुन्हा ‘घड्याळ’ 

मीरा भाईंदर महापालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते डॉ. असिफ शेख, माजी महापौर निर्मला सावळे आणि रमजान खत्री यांनी राष्ट्रवादीत घरवापसी केली (Mira Bhainder Leaders Joins NCP again in presence of Jayant Patil)

  • रमेश शर्मा, टीव्ही 9 मराठी, मीरा भाईंदर
  • Published On - 7:47 AM, 20 Jan 2021
राष्ट्रवादीत घरवापसीचं सत्र, जयंत पाटलांच्या उपस्थितीत माजी महापौरांच्या हाती पुन्हा 'घड्याळ' 

मीरा भाईंदर : मीरा भाईंदर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसीचं सत्र सुरु झालं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेत मीरा भाईंदरच्या माजी महापौर, माजी विरोधीपक्ष नेते यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पुन्हा घड्याळ बांधले. भाजप, शिवसेना आणि काँग्रेस अशा तिन्ही प्रमुख पक्षातील नेते-कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच पुनर्प्रवेश केला. (Mira Bhainder Leaders Joins NCP again in presence of Jayant Patil)

माजी महापौर-माजी विरोधीपक्ष नेत्याची घरवापसी

राष्ट्रवादीचा हात सोडून दुसऱ्या पक्षात गेलेल्या नेत्यांची घरवापसी सुरु झाली आहे. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. यामध्ये मीरा भाईंदर महापालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते डॉ. असिफ शेख, माजी महापौर निर्मला सावळे आणि रमजान खत्री यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

गेल्या वेळी मीरा भाईंदर महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला अलविदा करुन भाजप, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये गेले होते. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे.

वंचितचे पदाधिकारीही राष्ट्रवादीत

यावेळी माजी आमदार हरिदास भदे यांच्या पुढाकाराने नागपूरमधील धनगर समाजाचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र थोटे, भोई समाज बहुद्देशीय फाऊंडेशनचे बंडुभाऊ सुरजुसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Mira Bhainder Leaders Joins NCP again in presence of Jayant Patil)

मीरा भाईंदरमध्ये पक्षांतराचे वारे

मीरा भाईंदरच्या काशीमिरा हायवे पट्ट्यातील शिवसेनेचे नेते मेंनेंजीस सातन यांनी शिवसेनेला राम राम ठोकला. महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांच्या उपस्थितीत त्यांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी सातन यांच्या शेकडो समर्थकांनीही काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला.

याआधीही शिवसेना आणि काँग्रेसमधील नेत्यांनी एकमेकांच्या पक्षात उड्या मारल्या आहेत. परंतु महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर अशा पक्षांतराकडे राजकीय वर्तुळात गांभीर्याने पाहिले जात आहे. विशेषतः शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये पारनेरच्या नगरसेवकांवरुन मोठं राजकीय नाट्य रंगलं होतं.


संबंधित बातम्या :

शिवसेना नेत्याने शिवबंधन सोडले, काँग्रेसचा ‘हात’ हाती

‘एमआयएम’नंतर आता राष्ट्रवादीचा शिवसेनेलाही धक्का; सोलापुरातील हा बडा नेता ‘घड्याळ’ बांधणार

(Mira Bhainder Leaders Joins NCP again in presence of Jayant Patil)