AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मीरा-भाईंदरमध्ये शाळेचा अजब फतवा, विद्यार्थ्याने डब्यात आणलेल्या मेथीच्या भाजीवर 50 रुपयांचा दंड

मीरा-भाईंदरमध्ये शाळेचा अजब फतवा समोर आलाय. एका विद्यार्थ्याने डब्यात आणलेल्या मेथीच्या भाजीवर 50 रुपयांचा दंड आकारल्यचा दावा करण्यात येत आहे.

मीरा-भाईंदरमध्ये शाळेचा अजब फतवा, विद्यार्थ्याने डब्यात आणलेल्या मेथीच्या भाजीवर 50 रुपयांचा दंड
mira bhayndarImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 22, 2026 | 8:37 AM
Share

मिरा-भाईंदर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. पर्यषण काळाच्या नावाखाली आता शालेय विद्यार्थ्यावर अजब बंधने घालण्याचा प्रकार आता सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वी भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या शाळेत विद्यार्थ्यांना डब्यात कांदा, लसूण, बटाटा, बीट, कंदमूळ आणण्यास बंदी घातली होती. शाळेच्या कँटिनमध्येही यावर बंदी घातली होती. पर्यषण काळातील अजब फतव्यावरून राज्यभरातून एकच टीका झाली. त्यानंतरही मीरा-भाईंदरमध्ये अजब फतवे सुरूच आहे. आता तर शाळेत डब्यात मेथीची भाजी आणल्याने एका विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड ठोठावल्याची घटना घडली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, विद्यार्थ्याने मेथीची भाजी आणल्यानंतर कॅन्टिनमधून दुसरी भाजी घेण्यास भाग पाडलं. त्यानंतर या विद्यार्थ्याकडून 20 रुपये आकारल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर शिक्षण विभागाने संबंधित शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शाळेत मेथीची भाजी आणण्यास मनाई केली आहे. त्यामुळे शाळेने विद्यार्थ्याला कॅन्टिनमधून दुसरी भाजी घेण्यास सांगून 20 रुपये आकारले. मीरा-भाईंदरमधील तपोवन विद्यालयात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्याने शिक्षण विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर शिक्षणविभागाने शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली. खरंतर कायद्यानुसार, विद्यार्थ्याला असे नियम लावता येत नाही. त्यानुसार शाळेने समाधानकारक उत्तर न दिल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा विभागाने दिला आहे.

शाळेच्या नियामावरून राजकारण पेटलं आहे. याआधी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या शाळेतील फतव्यावरून ठाकरे गटाने जोरदार टीका केली होती. आमदार आदित्य ठाकरे यांनी मराठी सर्वच पद्धतीचं अन्न खात असल्याचे सांगितले होते. त्यामुळे खाण्यावरून निर्बंध लावण्याचे चुकीचे असल्याचे म्हटलं होते. त्यांनी यावरून आमदार नरेंद्र मेहता यांना खेडबोल सुनावले होते. आता नरेंद्र मेहता यांच्या मतदारसंघातूनच एका तपोवन शाळेचा अजब फतवा समोर आलाय.

या शाळेच्या नियमावरून ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी जोरदार टीका केली आहे. दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत टीका केली आहे. अंबादास दानवे यांनी म्हटलं की, ‘मीरा-भाईंदरच्या एका विद्यालयाने डब्यात पौष्टिक अशी मेथीची भाजी आणल्याबद्दल विद्यार्थ्याला ₹५० चा दंड ठोठावला. बरं झालं बिचाऱ्याने पिझ्झा किंवा बर्गर आणला नाही, नाहीतर शाळेने थेट ‘आदर्श विद्यार्थी’ पुरस्कार देऊन सत्कारच केला असता’. तत्पूर्वी, तपोवन विद्यालय शाळेची अल्पसंख्याक शाळा म्हणून नोंद असल्याचे समोर येत आहे. शाळेला काही नियम करण्याचा अधिकार आहे, असा दावा केला जात आहे. परंतु शाळेला अशाप्रकारे दंड करण्याचा अधिकार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...