AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कलमा वाचता येतो का? म्हणत हल्ला, अमेरिकेतून आला, कुर्ल्यात राहिला, नंतर नयानगरमध्ये… मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर

मीरारोड येथे तुला कलमा वाचता येतो का ? नमाज पढता येतो का असं विचारून एका व्यक्तीने दोन सुरक्षारक्षकावर हल्ला केला आहे. या प्रकरणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कलमा वाचता येतो का? म्हणत हल्ला, अमेरिकेतून आला, कुर्ल्यात राहिला, नंतर नयानगरमध्ये... मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर
देवेंद्र फडणवीसImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 28, 2026 | 1:05 PM
Share

मुंबईतील मीरारोड येथे रविवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. तुला कलमा वाचता येतो का ? नमाज पढता येतो का असं विचारून एका व्यक्तीने दोन सुरक्षारक्षकावर हल्ला केला. जैब जुबेर अन्सारी असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी जैबला तातडीने अटक केली. त्याच्याकडे ISIS, जिहाद अशी लिहीलेली नोटसुद्धा आढळली आहे. त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आरोपीची संपूर्ण कुंडली सांगितली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच सोलापूरात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना मीरारोड येथे झालेल्या हल्ल्याबाबत विचारण्यात आले. त्यावर त्यांनी, “मूळात एकूण हे जे प्रकरण आहे ते बघितलं तर सेल्फ रॅडिकलायझेशनचं हे प्रकरण आहे. मोठ्या प्रमाणात पुस्तकं, साहित्य, इंटरनेट या माध्यमातून रॅडिकलायझेशनचा प्रयत्न आहे त्या प्रयत्नातून हा जो व्यक्ती आहे, जो आरोपी आहे तयार झालेला दिसतोय. त्यामुळे याला केवळ काही तरी आपल्याला जिहाद करायचे आहे आणि जिहाद करायचं म्हणजे इतर धर्मियांना मारायचे आहे अशा पद्धतीच्या विचाराने पेटून त्याने हे कार्य केलेलं आहे. त्याला पकडले आहे असे म्हटले.”

पुढे ते म्हणाले, “आता एटीएस आणि एनआयची मदत घेऊन या रॅडिकलायझेनच्या पाठीमागे कोण कोण आहे? हे देखील शोधण्यात येईल. याचं कुटुंब हे परदेशात आहे. ते अमेरिकेमध्ये आहे. हा देखील अनेक वर्ष परदेशात राहिला आहे. त्यानंतर इथे आल्यानंतर पहिल्यांदा कुर्ल्यामध्ये त्यानंतर नवानगरमध्ये तो राहायला आला त्यामुळे आता याच्या पाठीमागे आता कोण कोण आहे? याच्या लिंकमध्ये कोण कोण आहे? अजून कोणी असे रॅडिकलाइज झाले आहेत का? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तपासामध्ये पुढे येतील.”

नेमकं प्रकरण काय?

रविवारी सकाळी नयानगर (मीरा रोड पूर्व) येथील वॉकहार्ट हॉस्पिटलच्या मागे, अस्मिता एन्क्लेव्हजवळ बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत सकाळी 8 च्या सुमारा एका इसमाने दोघांवर चाकू हल्ला केला. हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव जैब जुबेर अन्सारी असे आहे. त्याने तुला कलमा वाचता येतो का? नमाज पढता येतो का असं विचारून आरोपीने सुरक्षारक्षकावर हल्ला केला होता. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेताच त्याच्याकडे ISIS, जिहाद अशी लिहीलेली नोटसुद्धा आढळली. या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे.

Follow Us
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी शिक्षण मंत्री
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या घरी, राज्याच्या राजकारणात मोठं घडतंय?
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या.... निर्मला सीतारमण यांच्याबाबत ठाकरे
पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या.... निर्मला सीतारमण यांच्याबाबत उद्धव ठाकरे हे काय म्हणाले?
ही जनतेच्या आंदोलनाची ताकद, अखेर सरकारला नमवलं; राज ठाकरेंचं भाषण...
ही जनतेच्या आंदोलनाची ताकद, अखेर सरकारला नमवलं; राज ठाकरेंच्या भाषणाची जोरदार चर्चा
एकाहुन एक पोस्टर अन् मिम्स, ठाकरेंच्या विजय सभेसाठी समर्थकांची गर्दी
Thackeray Sabha Video | एकाहुन एक पोस्टर अन् मिम्स, ठाकरेंच्या विजय सभेसाठी समर्थकांची मोठी गर्दी
एकच जल्लोष! मनसेतील बड्या नेत्यांचा लोकलने प्रवास, ट्रेनमधील Video...
एकच जल्लोष! मनसेतील बड्या नेत्यांचा लोकलने प्रवास, ट्रेनमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल