भाजपच्या राहू केतूंना सद्बुद्धी द्यावी, तुळजापुरातील डान्स बार बंद करण्यासाठी आवाज उठविणार : आमदार मेटकरी

राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार अमोल मिटकरी आक्रमक झाले आहेत. तुळजापूरमध्ये आपण स्त्रीशक्तीचा जागर करतो तर दुसरीकडे डान्स बार सुरू झाला आहे. ही लज्जास्पद बाब आहे, असं अमोल मिटकरी म्हटलंय.

भाजपच्या राहू केतूंना सद्बुद्धी द्यावी, तुळजापुरातील डान्स बार बंद करण्यासाठी आवाज उठविणार : आमदार मेटकरी
AMOL MITKARI


उस्मानाबाद : राज्यात डान्स बारला बंदी असताना तुळजापुरात खुलेआम बार सुरु आहेत. अशाच एका डान्स बारमधील व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार अमोल मिटकरी आक्रमक झाले आहेत. तुळजापूरमध्ये आपण स्त्रीशक्तीचा जागर करतो तर दुसरीकडे डान्स बार सुरू झाला आहे. ही लज्जास्पद बाब आहे, असं अमोल मिटकरी म्हटलंय.

डान्स बार बंद करण्यासाठी अधिवेशनात आवाज उठविणार

तुळजापूर येथे डान्स बार सुरू झाला असून ही लज्जास्पद बाब आहे. आपण तुळजापूर येथे स्त्रीशक्तीचा जागर करतो. पण सध्या दुसरीकडे डान्स बार सुरू झाला आहे. हा डान्स बार बंद करण्यासाठी आगामी अधिवेशनात आवाज उठविणार आहे, असे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले.

भाजपचे राहू केतू यांना सद्बुद्धी द्यावी

तसेच पुढे बोलताना त्यांनी केंद्र सरकारवरदेखील टीका केली. महाविकास आघाडीचे काम चांगले असताना केंद्र सरकारचा ससेमिरा लागला आहे. नतद्रष्ट केंद्र सरकार व त्यामधील भाजपचे राहू केतू यांना सद्बुद्धी द्यावी, असे साकडे त्यांनी तुळजाभवानी चरणी घातलेय.

शहरांची नावे बदलून विकास होत नाही

तसेच पुढे बोलताना औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या वादावरही प्रतिक्रिया दिली. “शहरांची नावे बदलून विकास होत नाही. औरंगाबाद आणि संभाजीनगर हा मुद्दा महत्त्वाच असला तरी नावे बदलून हिंदू समर्थक किंवा विरोधक ठरत नाही. टप्प्याटप्प्याने नावे बदलू आणि बदलनारच. ज्यांना नावे बदलण्यासाठी वेठीस धरायचे आहे त्यांनी गुजरातमधील नावे मोदी यांच्याकडून बदलून घ्यावी, असा टोलादेखील आमदार अमोल मेटकरी यांनी लगावला.

उल्हासनगरात डान्स बारवर कारवाई

दरम्यान, 11 ऑक्टोबर रोजी उल्हासनगर शहरात डान्स बारवर कारवाई करण्यात आली. येथे गुन्हे शाखेनं बारबालांसह वेटर आणि ग्राहकांना ताब्यात घेतलं होतं. चांदनी नावाच्या बारवर ही कारवाई करण्यात आली होती. 17 बारबालांसह वेटर आणि ग्राहक अशा 40 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. उल्हासनगरच्या 17 सेक्शन चौकाजवळ चांदनी नावाचा बार आहे. या बारमध्ये बारबाला बिभत्स नृत्य करत असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी स्वतः पथकासह शनिवारी रात्री उशिरा या बारवर धाड टाकली होती.

बारबाला, वेटर, ग्राहकांवर कारवाई

यावेळी बारमध्ये 17 बारबाला अश्लील हावभाव करत नृत्य करत असल्याचं समोर आल्यानं या बारवर कारवाई करण्यात आली होती. यावेळी 17 बारबाला, 13 वेटर्स आणि 10 ग्राहकांना गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं होतं.

इतर बातम्या :

समीर वानखेडेसह एनसीबीवर पंचाचाच बाँब, शाहरुख खानकडे 25 कोटी मागितल्याचा दावा, वानखेडेला 8 कोटी द्या!

‘तोडपाणी करण्यासाठी सगळं सुरु’, तपास यंत्रणांच्या धाडीवरुन पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

गोसावीच्या बॉडीगार्डचे एनसीबीविरोधात खळबळजनक दावे; नवाब मलिक म्हणतात, एसआयटीमार्फत चौकशी करा

(MLA Amol Mitkari comment on tuljapur dance bar said will demand in upcoming assembly winter session to close bar)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI