तूर्तास दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण नाही? सुनेत्रा पवार यांनी आमदारांना काय सांगितलं?; हिरामण खोसकर यांचा सर्वात मोठा दावा काय?

अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा चर्चेत आला. त्यामध्येच देवगिरी बंगल्यावर महत्वाची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री आणि आमदार उपस्थित होते. नुकताच या बैठकीबद्दल मोठी अपडेट पुढे येत आहे.

तूर्तास दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण नाही? सुनेत्रा पवार यांनी आमदारांना काय सांगितलं?; हिरामण खोसकर यांचा सर्वात मोठा दावा काय?
Hiraman Khoskar
| Updated on: Feb 17, 2026 | 12:13 PM

निखिल चव्हाण, मुंबई : सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये देवगिरी बंगल्यावर काल महत्वाची बैठक झाली. या बैठकीला हिरामण खोसकर उशिरा पोहोचले होते. आता या बैठकीबद्दल हिरामण खोसकर यांनी मोठी माहिती दिली आहे. हिरामण खोसकर यांनी म्हटले की, देवगिरीवरती काल बैठक झाली. चार ते पाच फोन झाली परंतु मी नाशिक मध्ये होतो. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने काही बैठक होत्या, अनेक शेतकरी या ठिकाणी आंदोलनाला बसले होते. घोटी त्रंबक हा हायवे साडेआठशे कोटींचा रस्ता आहे 22 गाव बाधित होत आहेत ती मीटिंग आणि त्यानंतर साधूग्रामची मीटिंग एमएसईबीच्या अशा अनेक बैठकी होत्या. रस्त्यात ट्राफिक असल्यामुळे मला वेळेत पोहोचता आले नाही. पण मी साडेआठच्यानंतर पोहचलो. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल आणि तटकरे यांना मी भेटलो.

पुढे बोलताना हिरामण खोसकर यांनी म्हटले की, विलिनीकरणाचा कुटुंबाचा विषय आहे आणि पुढचा विषय कसा करता येईल ते बघतो बोलल्या परंतु सध्या जशी परिस्थिती आहे तसेच पुढे जायचंय असं त्यांनी सांगितलं. परंतू मी लेट गेल्यामुळे त्यांचे भाषण झालेले होते. काल बैठकीला लेट गेलो त्यामुळे कुठल्याही आमदाराशी माझी भेट झाली नाही. पुढच्या मिटिंगला माझी चर्चा होईल आणि माहिती मिळेल.

काही जणांचे फक्त फोन आले काही चर्चा अशी झाली नाही. सुनील तटकरे यांनी देखील सांगितले की हा विषय कुटुंबाचा आहे ते निर्णय घेतील तो आपल्याला मान्य करावे लागेल. सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्षासाठी सर्व आमदारांचा पाठिंबा आहे, झिरवळ यांच्याबद्दल बोलताना हिरामण खोसकर यांनी म्हटले की, नरहरी झिरवळ हे सामान्य लोकांमध्यले मंत्री आहेत आणि यांच्यावरती आक्षेप येत आहेत.

हे सगळे चुकीचे आहे, एखादा सामान्य मंत्री आदिवासी नेत्यावरती असे आरोप करू नये. ज्या वेळी घटना घडली त्यावेळी ते दिल्लीला होते. पण हे जे केलेले आहे ते क्लार्कने केले आहे. मंत्र्यांकडे 40 ते 25 लोकांचा स्टाफ असतो. त्यामधील लोकांनी असे काही केले तर ते मंत्र्यांकडे येणे चुकीचे आहे. कोणीही या संदर्भात राजकारण केलेले चुकीचा आहे.

नरहरी झिरवळ यांना भेटण्यासाठी मी चाललेलो आहे. अल्पसंख्यांक विभागातील जे पत्र काढले हा वरच्या लेव्हलचा विषय आहे आम्ही सामान्य आमदार आहोत. अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल बोलताना हिरामण खोसकर यांनी म्हटले की, मुख्यमंत्री आणि अजित दादा यांचे वेगळे प्रेम होते. आम्हाला खात्री आहे की, या तपासात मुख्यमंत्री आणि मोदी कुठली कसर करणार नाहीत, तपासात सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे.

या तपासात आम्हाला बारकाईला जाता येत नाही परंतु घातपात असेल तर आम्हाला या ठिकाणी न्याय मिळेल मुख्यमंत्री न्याय देतील. नाशिकमधील बैठकीबद्दल बोलताना त्यांनी म्हटले, अरे त्र्यंबकेश्वरला पंचवीस लाख रुपये गुंठा चालू आहे तर या ठिकाणी एक लाख रुपये गुंठा एवढी किंमत देत आहेत तर स्थानिकांना त्रास देऊन कुंभमेळा करणे याच्या मी विरोधात आहे. अनेक शेतकरी त्या ठिकाणी आहेत, भात शेती वरती अवलंबून आहे.