AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ghabadkund : ‘वेलकम टू द जंगल’, ‘देऊळ बंद 2’ यांच्या शर्यतीत ‘घबाडकुंड’चं जबरदस्त कलेक्शन

Ghabadkund Total Collection : मराठी, हिंदी आणि हॉलिवूड चित्रपटांशी स्पर्धा असतानाही 'घबाडकुंड' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत किती कोटी रुपये कमावले, ते जाणून घ्या..

Ghabadkund : 'वेलकम टू द जंगल', 'देऊळ बंद 2' यांच्या शर्यतीत 'घबाडकुंड'चं जबरदस्त कलेक्शन
घबाडकुंडImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 05, 2026 | 8:58 AM
Share

मराठी, हिंदी आणि हॉलिवूडमधील बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होत असतानाही ‘घबाडकुंड’ने प्रेक्षकांची पसंती मिळवत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी नोंदवली आहे. रहस्य, थरार आणि भयाचा अनोखा अनुभव देणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, अनेक चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुलचे फलक झळकताना दिसत आहेत. ‘राजा शिवाजी’, ‘तुंबाडची मंजुळा’, ‘देऊळ बंद 2’, या मराठी चित्रपटांसोबत बॉलिवूडचे ‘कॉकटेल’, ‘में वापस आऊंगा’, ‘वेलकम टू द जंगल’ आणि हॉलिवूडमधील ‘द ओडिसी’, ‘स्पायडर-मॅन’ तसंच ‘ऑब्सेशन’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांची स्पर्धा असतानाही ‘घबाडकुंड’ने आपल्या वेगळ्या आशयाच्या जोरावर प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी नोंदवली आहे.

बॉक्स ऑफिस कलेक्शन

दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 8.10 कोटींची कमाई करत यशाची नवी उंची गाठली आहे. ‘घबाडकुंड’ने आता तिसऱ्या आठवड्यातही दिमाखदार वाटचाल सुरू ठेवली आहे. मराठी, हिंदी आणि हॉलिवूडमधील मोठ्या चित्रपटांशी स्पर्धा असतानाही ‘घबाडकुंड’ने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटावरील प्रेक्षकांचं प्रेम कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

शोज वाढवले

चित्रपटातील लेखन, दिग्दर्शन, दमदार कलाकारांचा अभिनय, प्रभावी संवाद, पार्श्वसंगीत, तांत्रिक मांडणी आणि उत्कंठावर्धक सादरीकरण या सर्वच बाबींचं प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे. त्यामुळे ‘घबाडकुंड’ची चर्चा सोशल मीडियासह सर्वत्र रंगताना दिसत आहे. पहिल्या आठवड्यापासून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे अनेक चित्रपटगृहांमध्ये शोची संख्या वाढवण्यात आली. अनेक ठिकाणी प्रेक्षकांनी आगाऊ बुकिंगलाही मोठा प्रतिसाद दिला आहे. कुटुंबासह, मित्रमंडळींसोबत आणि ग्रुप बुकिंगद्वारे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहांकडे गर्दी करत आहेत. टिकिटिंग प्लॅटफॉर्मवरही ‘घबाडकुंड’ला प्रेक्षकांकडून उत्कृष्ट रेटिंग मिळत असून, सकारात्मक ‘वर्ड ऑफ माऊथ’मुळे नव्या प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे.

रहस्य, थरार अन्..

रहस्य आणि थराराचा वेगळा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांकडे पुन्हा एकदा मोर्चा वळवला असून, तिसऱ्या आठवड्यातही ‘घबाडकुंड’ची यशस्वी घोडदौड कायम राहणार असल्याचा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे. या चित्रपटात शशांक शेंडे, संदीप पाठक, देवदत्त नागे, कुशल बद्रिके, प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, योगेश प्रकाश तनपुरे, साहिल अनलदेवर अशी कलाकारांची फौज पहायला मिळते.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा