AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वल्लभनगरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाला आमदार लक्ष्मण जगताप यांची दुसऱ्यांदा भेट

विलीनीकरण नाही, तर आंदोलन मागे नाही ही भूमिका कायम असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. आपल्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसोबत - आमदार लक्ष्मण जगताप

वल्लभनगरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाला आमदार लक्ष्मण जगताप यांची दुसऱ्यांदा भेट
laxman jagatap
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Dec 05, 2021 | 6:35 PM
Share

पिंपरी- एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला आमदार लक्ष्मण जगताप यांनी आज दुसऱ्यांदा भेट दिली. या कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यांनी आंदोलनाची स्थिती आणि येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. आंदोलन सुरू असेपर्यंत सर्व आंदोलक कर्मचाऱ्यांना जेवण पुरवण्याची जबाबदारी आपली जबाबदारी म्हणून आमदार जगताप यांनी स्वीकारली. तसेच अन्य कोणतीही अडचण आल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले.

मागण्या मान्य झाल्याशिवाय हटणार नाही एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यात एक महिन्यांहून अधिक काळ झाले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वल्लभनगर येथे एसटीचे स्थानक व डेपो आहे. येथील190 हून अधिक कर्मचारीही राज्यभर सुरू असलेल्या अंदोलनात सहभागी आहेत. एसटी स्थानकाच्या बाहेर छोटा मंडप टाकून हे कर्मचारी शांततेने आंदोलन करत आहेत. परंतु, आता प्रशासनाने कर्मचाऱ्यांना हा मंडप हटवण्यास भाग पाडून एसटी स्थानकाच्या 200 मीटर परिसराबाहेर आंदोलन करण्यास सांगितले आहे. त्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांनी स्थानकापासून २०० मीटर परिसराबाहेर पुन्हा जामाने आंदोलन सुरू ठेवले आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी दुसऱ्यांदा एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन त्यांच्याशी संवाद साधला. आंदोलनाच्या सद्यःस्थितीबाबत माहिती घेतली. विलीनीकरण नाही, तर आंदोलन मागे नाही ही भूमिका कायम असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. आपल्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसोबत आपण असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.

MLC election | भाजप नगरसेवकांची सहल, काँग्रेसनं घेतला आक्षेप, हा आचारसंहिता भंग नाही का?

कुबेरांचं पुस्तक मी वाचलं, हल्ल्याची घटना निंदनीय, कोणत्याही प्रकारचे समर्थन नाही : शरद पवार

Jalna : कुणी मायीचे दूध पिलेला असेल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवा, रावसाहेब दानवेंचं खुलं आव्हान

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...