Gulabrao Patil | कोरोनानं खूप काही शिकवलं, रस्त्यावर भाजी विकून पोट भरता येतं, तरुणांनो लाज बाळगू नका; गुलाबरावांचं आवाहन

गुलाबराव पाटील म्हणाले, कोरोनाने आपल्याला शिकवण दिली आहे. रस्त्यावर भाजीपाला विकला तरी आपण पोट भरु शकतो. त्यामुळं रस्त्यावर भाजीपाला विकायची लाज बाळगू नका, असं आवाहनंही त्यांनी केलं.

Gulabrao Patil | कोरोनानं खूप काही शिकवलं, रस्त्यावर भाजी विकून पोट भरता येतं, तरुणांनो लाज बाळगू नका; गुलाबरावांचं आवाहन
गुलाबराव पाटील

जळगाव : कोरोनाने आपल्याला शिकवण दिली आहे. रस्त्यावर भाजीपाला विकला तरी आपण पोट भरु शकतो. त्यामुळं रस्त्यावर भाजीपाला विकायची लाज बाळगू नका, असं आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. वधू-वर परिचय मेळाव्यात ते आज बोलत होते.

मुलींचे प्रमाण चिंताजनक

जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण खूप कमी आहे. जिल्हयात १ हजार मुलांमागे ८९१ मुली आहेत. त्यामुळं वधू-वर परिचय मेळाव्यात, असं मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं.

शेतकरी मुलांचाही विचार करावा

जळगाव कोरोनाने आपल्याला शिकवून दिलं की, रस्त्यावर भाजीपाला विकला तरी आपण आपला प्रपंच चालवू शकतो. असे म्हणताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यापारी बदलू शकतो. मात्र शेतकरी बदलू शकत नाही, असे वक्तव्य केलं. सोबतच जोडीदार निवडताना शेतकरी मुलाचाही मुलींनी विचार करावा, असं आवाहन त्यांनी केलं. लेवाभवनात रविवारी कोळी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा पार पडला. त्यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे बोलत होते.

कामाची लाच बाळगू नका

आपण आपल्या शेतात पिकवलेला भाजीपाला, फळे रस्त्यावर विकली तरी आपण पोट भरु शकतो. आपल्याला त्या कामाची शरम असायला नको, ही मानसिकता मुलामध्ये असली पाहिजे. नोकरीला नाही तर स्वतः चार जण आपल्याकडे नोकरीला ठेवू शकतो, असेही यावेळी पालकमंत्री मनोगतात म्हणाले. यावर प्रकाश टाकताना पालकमंत्री पाटील यांनी अशाप्रकारे मेळावे गरजेचे असली तर मात्र मेळाव्यांमधून किमान दहा तरी विवाह जुळावेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

कुबेरांच्या ‘रेनेसान्स स्टेट: द रिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावर बंदी घाला; संभाजी ब्रिगेडची पुन्हा मागणी

Girish kuber : हे लिहिल्यामुळे गिरीश कुबेरांवर नाशकात शाईफेक, काय होता मजकूर? वाचा सविस्तर

Nashik : संभाजी ब्रिगेड निवेदनातून नाराजी व्यक्त करेल वाटलेलं, शाईफेकीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Published On - 5:32 pm, Sun, 5 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI