AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महादेव बेटिंग अ‍ॅप पुन्हा चर्चेत; सुरेश धस यांचे गंभीर आरोप, केली मोठी मागणी

महादेव बेटिंग अ‍ॅपचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आमदार सुरेश धस यांनी या घोटाळ्यावरून गंभीर आरोप केले आहेत.

महादेव बेटिंग अ‍ॅप पुन्हा चर्चेत; सुरेश धस यांचे गंभीर आरोप, केली मोठी मागणी
| Updated on: Dec 27, 2024 | 3:38 PM
Share

आज आमदार सुरेश धस यांनी बीडच्या पोलीस अधीक्षाकांची भेट घेतली, या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. सुरेश धस यांच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा महादेव बेटिंग अ‍ॅप घोटाळा चर्चेत आला आहे. जिल्ह्यात महादेव बेटिंग अ‍ॅपच्या नावाखाली अब्जावाधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले सुरेश धस? 

महादेव बेटिंग अ‍ॅपमध्ये मोठा घोटाळा  झाला आहे.  एका व्यक्तीच्या नावावर नऊ अब्ज रुपयांची नोंद आहे. याचाच अर्थ याप्रकरणात अब्जवाधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणात जे चांगले काम करणारे अधिकारी होते, त्यांना बाहेर काढण्यात आलं, आणि दुसरे अधिकारी आणून बसवले. या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळून देण्यासाठी मदत करण्यात आली. त्यांना सहकार्य करण्यात आलं. या घोटाळ्याची लिंक मलेशियापर्यंत आहे. मतदारसंघात एका व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचा व्यवहार आहे. मात्र अजूनही काही ठिकाणी पोलीस दल निष्क्रियता दाखवत आहे, असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आज मी पोलीस अधीक्षाकांची भेट घेतली. त्यांना लेखी पत्र दिलं आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्यातल्या पोलीस दलातील पोलिसांची यादी मला द्यावी अशी मागणी मी केली आहे. त्यांची संख्या बिंदू नामावली प्रमाणे आहे का? हे चेक केलं जाईल. ती तशी नसेल तर हा बीड जिल्ह्यावर अन्याय आहे. हे मी राज्य सरकारच्या लक्षात आणून देईल. मग त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील. बीड जिल्ह्यातलं कोणतंही प्रकरण घ्या, त्यामागे आकाच असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

एकट्या सिरसाळ्यामध्ये 600 विटभट्ट्या आहेत, त्यातील 300 विटभट्ट्या या इनलिगल आहेत. गायरान जमिनीवर जे गरिबांचे घर होते, त्यांना पण हटवण्यात आलं. तीथे शॉपिंग मॉल बांधण्यात आले, बीडमधील कोणतंही प्रकरण असो, त्यामागे आकाच असल्याचा आरोप यावेळी सुरेश धस यांनी केला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा बीडचं राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?