AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगजेबची कबर तोडा, आम्ही तिथे मूत्रालय बांधू… अकोल्यात येऊन भाजपचा बडा नेता गरजला

T Raja Singh : आमदार टी राजा सिंह यांच्याकडून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी 'हिंदू राष्ट्र जागृती सभा' आयोजित करण्यात आल्या आहेत. अकोल्यातील सभेत त्यांनी औरंगजेबची कबर तोडण्याची मागणी केली आहे.

औरंगजेबची कबर तोडा, आम्ही तिथे मूत्रालय बांधू... अकोल्यात येऊन भाजपचा बडा नेता गरजला
T Raja SinghImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 03, 2026 | 11:23 PM
Share

तेलंगणातील आमदार टी राजा सिंह यांच्याकडून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी ‘हिंदू राष्ट्र जागृती सभा’ आयोजित करण्यात आल्या आहेत. या सभांमध्ये हिंदुत्व, लव्ह जिहाद आणि हिंदू राष्ट्र स्थापनेबाबत ते आपली भूमिका मांडत आहेत. आज अकोल्यात टी राजा सिंह यांच्या सभेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना विविध मुद्द्यावर भाष्य केले. त्यांनी औरंगजेबाची कबर तोडण्याचीही भाषा केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अकोल्यातील सभेत बोलताना आमदार टी राजा सिंह यांनी म्हटले की, अकोल्यात येण्याचं भाग्य मला पहिल्यांदा लाभलंय. महाराष्ट्रमध्ये हिंदुत्ववादी, भगवाधारी सरकार असूनही सभा घेण्यासाठी कोर्टाची मदत घ्यावी लागते हे दुर्दैव आहे असं म्हणत राजा सिंह यांनी राज्यातील भाजप सरकारवर टीका केली आहे.

मी शिवराय आणि संभाजी राजांचा माळवा

पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, मी राज्य सोडून हिंदूंच्या जनजागृतीसाठी देशभरात फिरतोय. देशात गोल टोपीवाले गजवा ए हिंदचा नारा देत आहेत. मला नोटीसमध्ये पोलिसांनी जिहादी शब्द वापरण्याला मनाई केली होती. मला यावेळी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते. ते दुश्मनाला म्हणायचे ‘ए लांडो, कायदेए रहोगे तो फायदे मे रहोगे. तेलंगणात माझ्यावर अनेक गुन्हे दाखल. मात्र, मी कुणाला घाबरत नाही कारण मी शिवराय आणि संभाजी राजांचा माळवा आहे.

औरंगजेबची कबर तोडा

टी राजा सिंह यांनी म्हटले की, हैद्राबादमध्ये जेव्हा रामनवमीची शोभायात्रा निघते, तेव्हा गोल टोपीवाले टोपी लपवतात. आमचे सरकार औरंगजेबच्या कबरीसाठी साडेसहा लाख रुपये देते. देवेंद्रभाऊ, महाराष्ट्रातील हिंदूंनी औरंगजेबची कबर उध्वस्त करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी देशातून लाखो हिंदू घेऊन येऊ. बाबरी पाडण्याची जबाबदारी घेणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंचे नाव जोपर्यंत राममंदिर आहे तोपर्यंत अमर राहणार. औरंगजेबची कबर तोडून स्वतःचे नाव अमर करा. ती कबर तोडा आम्ही तिथे मुत्रालय बांधू.

गोहत्येचे पाप सात जन्म फिटत नाही

आमदार राजा सिंह यांनी आपल्या भाषणात पुढे म्हटले की, गोल टोपीवाले तुम्हाला मत देणार नाहीत. महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांवर जिहाद्यांचे अतिक्रमण आहे हे पुरातत्व विभागाला दिसत नाही का? या किल्ल्यावर लँड जिहाद सुरु आहे. जे नेते गो हत्या बघून शांत राहतात ते महापापी आहेत. गोहत्येचे पाप सात जन्म फिटत नाही. तेलंगणात गोहत्या थांबविण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतात. अकोला महापालिका स्थायी समिती सभागृहाला ‘टिपू सुलतान’ नाव कसे?. या सभागृहाचे नाव ‘छत्रपती संभाजी महाराज’ करा.

पंतप्रधान मोदींकडे 4 मागण्या

आपल्या भाषणाच्या शेवटी राजा सिंह यांनी म्हटले की, ‘हिंदूंची नवी स्कीम हम दो, हमारा एक. त्यांची स्कीम हम पाच, हमारे पचास. भारतीय जनता पार्टीची स्कीम नेता 75 वर्षाचा झाल्यानंतर मार्गदर्शक मंडळात पाठविण्याची. मात्र, आम्ही तुम्हाला त्या पदावरून जाऊ देणार नाही. तुम्हाला देश हिंदू राष्ट्र घोषित करण्याबरोबर हिंदूंच्या चार मागण्या मान्य करा. आम्हाला विकास नको, रस्ते नको, पण देशाला हिंदू राष्ट्र घोषित करा. दोनपेक्षा अधिक लेकरं होऊ देणाऱ्यांना लाथ मारून देशाबाहेर हाकला. त्यांना सरकारी योजणांचा लाभ देऊ नका. संसदेत खासदारांना मजा करायला पाठवले नाही, तुम्हाला देशाला हिंदू राष्ट्र करण्यासाठी पाठवले आहे.’

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ