AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackrey : ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले… राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले…

ठाकरे गटाचे सहा खासदार फुटण्याच्या वृत्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील राजकारणावर चिंता व्यक्त करत, "खासदार फोडणं, आमदार फोडणं" यावर टीका केली. दुष्काळी परिस्थिती असताना हे राजकारण राज्याला कसे नुकसान करत आहे आणि पुढच्या पिढीला काय सांगणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Raj Thackrey : ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले... राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
खासदार फुटीवर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: Jun 20, 2026 | 12:10 PM
Share

शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदार फुटल्याने अख्खा राज्यात खळबळ उडाली. शिंदेच्या या ऑपरेशन टायगरमुळे विविध चर्चांना उधाण आलं असून काल शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात ठाकरे गट आणि शिंदे गट, दोघांनीही यावरून एकमेकांवर यथेच्छ टीका केली. आता याच मुद्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील पहिली प्रतिक्रिया आली आहे. 6 खासदार फुटले आणि ते शिंदे गटात जाणार असल्याच्या बातम्यांवरून राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले. SIR कडे दुर्लक्ष करून नका असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

संपूर्ण देशाचा विचका झालाय, राज्याचा विचका झालयं. आपण आपल्या राज्याचे किती नुकसान करतोय. आज अजून पाऊस पडला नाही, महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती येणार आहे आणि आमच्यातला काय चाललंय खासदार फोडणं, आमदार फोडणं, नगरसेवक फोडणं… वाट्टेल तेवढे पैसे आम्ही द्यायला तयार आहोत, माणसं विकली जात आहेत. या गोष्टीचा विचार राजकारणी, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला नाही पाहिजे, हा विचार, जनतेने केला पाहिजे. ज्यांना निवडून आणण्यासाठी तुम्ही चार-पाच तास , उन्हामध्ये रांगेत उभे राहिलात. तो माणूस 50-100 कोटींसाठी विकल जातोय. त्यांना तुम्ही पुन्हा उभे करणार का ? आता ते आले तर तुम्ही निवडून देणार का?  असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

स्वाभिमान मेला की उरतात फक्त जिवंत प्रेतं

एक जुनं वाक्य आहे ते स्वाभिमान मेला ना की उरतात फक्त जिवंत प्रेतं. आणि हे ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात, देशामध्ये सुरू आहे, भविष्यातल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना काय सांगणार, आम्ही विकले गेलोत ? असाही प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. SIR कडे दुर्लक्ष करू नका याचा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला.

देशात अनेक प्रश्न आज आ वासून उभे असताना, आमच्याकडे काय सुरूये तर आमची सत्ता टिकावी म्हणून आम्ही कोट्यवधी रुपये  टाकायला तयार आहोत. आम्हाला खासदार फोडायचे आहेत, आमदार फोडायचे आहेत, नगरसेवक फोडायचे आहेत. तुमच्या मताला किंमत शून्य, रांगेत उभे रहा मेंढरासारखे, मतदान करा मोकळे व्हा असं राज राज ठाकरे म्हणाले.  आज हे भाजपकडून सुरूये, उद्या दुसऱ्या पक्षांकडून सुरू होईल, याला निवडणूक म्हणणार का ? मी काल बसलो असताना बोललो बर झालं आपले खासदार निवडून नाही आले, अशी टीका उद्विग्न राज ठाकरेंनी केली.

 

Follow Us
तामिळनाडूत मोठी खळबळ! भर मंचावरून अभिनेत्री तृषा कृष्णबद्दल डबल मिनिंग
तामिळनाडूत मोठी खळबळ! भर मंचावरून अभिनेत्री तृषा कृष्णबद्दल डबल मिनिंग विधान, थेट अटक
पेपरफुटी करणाऱ्यांची आता खैर नाही! हायकोर्टाचा मोठा निर्णय
Fast Track Court | पेपरफुटी करणाऱ्यांची आता खैर नाही! हायकोर्टाचा मोठा निर्णय, राज्यात तब्बल 23...
कर्ज फेडलं तरी जमीन गेली? नाशिकमध्ये शेतकऱ्याच्या जमिनीचा मोठा घोटाळा
कर्ज फेडलं तरी जमीन गेली? नाशिकमध्ये शेतकऱ्याच्या जमिनीवर मोठा घोटाळ्याचा आरोप
PM मोदींच्या निवासस्थानाबाहेर E20 इंधन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर...
PM मोदींच्या निवासस्थानाबाहेर E20 इंधन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; थेट...
महाराष्ट्राने ज्येष्ठ नेतृत्व गमावले; डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन
महाराष्ट्राने ज्येष्ठ नेतृत्व गमावले; काँग्रेस नेते डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन
मोठी खळबळ! अभिजीत दीपके यांच्या विरोधात थेट पोलिसांत FIR, तातडीने...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके यांच्या विरोधात थेट पोलिसांत FIR, तातडीने अटकेची मागणी
राम मंदिरावर बोलले... पण सिद्धिविनायकवर प्रश्न येताच राऊतांनी उत्तर...
राम मंदिरावर बोलले... पण सिद्धिविनायकवर प्रश्न येताच संजय राऊतांनी उत्तर टाळलं!
भाजपची लोकप्रियता घरसत आहे, सहाच महिन्यात 40 हजारांहून अधिक मतदार....
भाजपची लोकप्रियता घरसत आहे, सहाच महिन्यात 40 हजारांहून अधिक मतदार.... राऊतांनी बिहार पोटनीवडणुकीबाबत नेमकं काय सांगितलं?
TV9 मराठीच्या बातमीची दखल! दोन बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग
TV9 मराठीच्या बातमीची दखल! दोन बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग; ठाण्यात रस्त्यांची तात्पुरती डागडुजी
रस्त्यावर ऑइल-चिखलाचा थर; 15 वाहनांची घसरगुंडी, नेमकं काय घडलं?
पुण्यात एकामागोमाग एक अपघात! रस्त्यावर ऑइल-चिखलाचा थर; 15 वाहनांची घसरगुंडी, नेमकं काय घडलं?