मुख्यमंत्र्यांसाठी गुजराती भाषेत उपरोधिक ट्विट, मनसे आमदारांची थेट गुजराती समाजाच्या कार्यक्रमास हजेरी

मनसे आमदार राजू पाटील यांनी गुजराती समाजाच्या कार्यक्रमात हजेरी लावल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. (MNS MLA Raju Patil)

मुख्यमंत्र्यांसाठी गुजराती भाषेत उपरोधिक ट्विट, मनसे आमदारांची थेट गुजराती समाजाच्या कार्यक्रमास हजेरी
राजू पाटील, आमदार, मनसे

कल्याण: आरटीओविभागाकडून  मराठी नंबर प्लेट लावणाऱ्या गाड्यांवर कारवाई केली जात असल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना गुजराती भाषेत उपरोधिक ट्विट केले होते. आमदार राजू पाटील यांनी आज गुजराती समाजाच्या एका संस्थेकडून आयोजित रक्तदान शिबीर हजेरी लावली आहे. इतकेच नाही तर पुढच्या कार्यक्रमासाठी मदत देण्याचे आश्वासनही राजू पाटील यांनी यावेळी दिले आहे. यामुळे मनसेच्या भूमिकेविषयी राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. (MNS MLA Raju Patil participate in Gujrati community blood donation camp)

डोंबिवलीत तरुण मित्र मंडळ या संस्थेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेकडून हे 100 वे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असून डोंबिवलीत आयोजित केलेले 26 वे रक्तदान शिबीर होते. या शिबीरात मोठ्या संख्येने नागरिकांनी रक्तदान केले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवरहे रक्तदान शिबीर आयोजित केले होते.

आगामी काळात महाराष्ट्रात महानगरपालिकांची रणधुमाळी सुरु होणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला राजकीय पक्ष लागले आहेत. भाजप आणि शिवसेनेने गुजराती समुदायाचे कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली आहे. भाजप आणि शिवसेनेनंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी गुजराती समुदायाच्या कार्यक्रमात सहभाग घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राजू पाटील यांचे गुजरातीमधील ट्विट

मनसे आमदार राजू पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आरटीओ विभागाकडून मराठी नंबरप्लेट वर कारवाई करण्यात येत असल्यानं गुजराती भाषेत ट्विट केले होते.


शिवसेनेकडून गुजराती बांधवांचा मेळावा

मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे यावेळी शिवसेनेने मुंबई राखण्यासाठी गुजराती मतदारांना जागृत करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ म्हणत शिवसेनेकडून गुजराती समाजासाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. अंधेरी-ओशिवरा इथल्या गुजरात भवनातील नवनीत हॉलमध्ये हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात 100 गुजराती व्यापारी उपस्थित राहिले होते.

संबंधित बातम्या

“कंपाऊंडर” डोक्यावर पडलेत का???” सामनातील मथळ्यावरुन संदीप देशपांडेंची खोचक टीका

पोलिसांनी वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग दाखवू; मनसेचा थेट इशारा

 

(MNS MLA Raju Patil participate in Gujrati community blood donation camp)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI