AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रामदास आठवले भाजपच्या झाडावर वाढलेलं…’, मनेसच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; जहरी टीका काय?

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली, या टीकेला आता मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

'रामदास आठवले भाजपच्या झाडावर वाढलेलं...', मनेसच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; जहरी टीका काय?
ramdas athwale
| Updated on: Dec 08, 2024 | 9:02 PM
Share

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून जोरदार निशाणा साधला होता. राज ठाकरे यांची या निवडणुकीत हवा गेली. त्यांना वाटायचे माझ्याशिवाय सत्ता येणार नाही, त्यांचे स्वप्न भंग झाले. राज ठाकरे यांना महायुतीत घेण्याचा फायदा नाही, मी असताना त्यांची काय गरज आहे,  असं आठवले यांनी म्हटलं होतं. दरम्यान आठवले यांच्या या टीकेला आता मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी यावरून आठलेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले प्रकाश महाजन? 

माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की आम्ही महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांना सोबत घेण्याचा विचार करू, आमचे हिंदुत्वाचे विचार एकत्र आहेत,  रामदास आठवले साहेब तुमचा पूर्ण आदर बाळगून एवढंच सांगू इच्छितो, गोपीनाथ मुंडे यांनी तुम्हाला भाजपच्या झाडाच्या खाली आणले. तुम्ही त्या झाडावर चढला आणि आता भाजपच्या झाडाचे बांडगुळ आहात. तुमच्यामुळे भाजपला काही फायदा होत नाही, पण भाजपमुळे तुम्ही अखंड मंत्री पदावर आहात ते तुम्ही लक्षात घ्यावं. दुसऱ्यावर टीका करताना आपण काचेच्या घरात आहोत, याचा त्यांनी विचार करावा. त्यांच्याविषयी पूर्ण आदर ठेवून मी हे बोलतो कारण त्यांनी माझ्या नेत्यावर आरोप केले आहेत. आठवले यांना फार गांभीर्यानं घेण्याची  गरज नाही असा हल्लाबोल प्रकाश महाजन यांनी आठवले यांच्यावर केला आहे.

नेमकं काय म्हणाले होते आठवले? 

राज ठाकरे यांची या निवडणुकीत हवा गेली. त्यांना वाटायचे माझ्याशिवाय सत्ता येणार नाही, त्यांचे स्वप्न भंग झाले. राज ठाकरे यांना महायुतीत घेण्याचा फायदा नाही, मी असताना त्यांची काय गरज आहे, असं आठवले यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर देखील निशाणा साधला,  लोकसभेत अपयश आलं, विधानसभेत यश आलं, आरक्षण जाणार असं सांगणाऱ्याला जनतेनं धडा शिकवला, असंही यावेळी आठवले यांनी म्हटलं आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.