MNS : ‘जे करायचंय ते करा’, पुढच्या आठवड्यात महाराष्ट्रात तुफान, मनसेकडून मोठ्या आंदोलनाची घोषणा
MNS : "याला काय म्हणायचं लोकशाहीचा खून आहे, तुम्हाला सर्वांनाच कळतंय जी चीड आहे ते दाखवण्यासाठी मनसे रस्त्यावर येणार. दडपण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे मनसे उतरणार आहे" असं नितीन सरदेसाई म्हणाले.

सध्या देशभरात आंदोलनाचं सत्र सुरु आहे. काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी सातत्याने SIR प्रक्रियेविरोधात आवाज उठवतायत. त्यांना पोलिसांनी अटकही केली. आज कॉकरोच जनता पार्टीने जंतर-मंतरवर आंदोलनाची हाक दिली होती. पण विमानातच अभिजीत दीपकेंना अटक करण्यात आली. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलनाची हाक दिली आहे. “सोमवारी जागोजागी सह्यांची मोहीम करतोय. पुढचा आठवडा महाराष्ट्राची जनता रस्त्यावर आलेली दिसेलच. त्यासाठी आम्हाला जेल मध्ये टाका वाटेल ते करा. आज जर आवाज उठवला नाही तर पुढची पिढी विचारेल कि लोकशाहीचा गळा घोटण्यात येत होता, तेव्हा तुम्ही कुठे होतात?” असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
“मुंबईत नाही तर महाराष्ट्र भर मोहीम असेल. आमच्या एकट्या पक्षाचे नाही तर लोकशाही वाचवण्याच्या आंदोलनात सहभागी व्हा. करुंद्यात डिटेन किती दिवस करायचंय आहे. सरकारने करावं तुम्हाला जे करायचंय ते करा आम्हाला जे करायचंय ते आम्ही करू. अभिजित दिपके याने काय केलंय, मर्डर, रेप काय केलंय? किती दिवस ठेवणार? उद्या दाबलात परवा आवाज करू किती दिवस आवाज दाबण्यात येईल. आम्हाला रोज पोलीस दिसतात आम्ही ही पोलिसांना बघतो जे करायचंय ते करा” असं संदीप देशपांडे म्हणाले.
सत्ताधारी पक्षाला मदत व्हावी यासाठी केलं आहे
“गेले काही दिवस आपण पाहतोय SIR मध्ये घोळ झालाय. त्याच्याबद्दल आंदोलनं सुरु आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी हे केलं आहे. सत्ताधारी पक्षाला मदत व्हावी यासाठी केलं आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की असे कोणतेही आदेश दिले नव्हते” असं नितीन सरदेसाई म्हणाले.
गर्जना मोर्चा काढल्यावर आम्ही थांबलो नाही
“भारतात सर्वांच्या मनात चीड आहे याबद्दल. गर्जना मोर्चा मध्ये चीड लोकांची दिसून आली. आता ही दिल्लीत दडपशाही सुरु आहे. विचित्र प्रकारे आंदोलन दडपणचे प्रयत्न आहेत. गर्जना मोर्चा काढल्यावर आम्ही थांबलो नाही. सोमवारी सकाळी सर्व ठिकाणी सह्यांची मोहीम राबवणार आहोत. सर्व सामान्य नागरिकांनी येऊन सह्या कराव्यात पाहिला टप्पा असेल. त्यानंतर दसऱ्या पर्यंत काय काय करू हे कळेल तुम्हाला” असं नितीन सरदेसाई म्हणाले.
अशी दडपशाही बघितली नाही
“सर्वसामान्यांच्या अधिकाऱ्यांवर गदा आणली जात आहे. लोकांच्या मनातील खदखद, चीड पुढे येण्यासाठी सोमवारपासून आमचं आंदोलन सुरु होईल. दिल्लीत ट्रेन बंद आहे. सर्वांनाच जाणवतंय यापूर्वी कोणीच अशी दडपशाही बघितली नाही. तुम्ही निवडणूक आयोगाबद्दल काही बोलायचं नाही असं सुरु आहे” असं नितीन सरदेसाई म्हणाले