AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता गुन्हेगारांची खैर नाही, पुराव्याअभावी कोणीच सुटणार नाही; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचं लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्सचे लोकार्पण केले. या व्हॅन्समुळे घटनास्थळीच पुरावा तपासणी आणि संकलन शक्य होणार आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून पुराव्यांची अखंडता राखली जाईल. 256 व्हॅन्स तयार करण्याचे नियोजन आहे, 21 व्हॅन्स सध्या वापरात आहेत. यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात आणि अपराध सिद्धी दरात वाढ होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

आता गुन्हेगारांची खैर नाही, पुराव्याअभावी कोणीच सुटणार नाही; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचं लोकार्पण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
| Updated on: Jan 27, 2025 | 1:51 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्सचं लोकार्पण करण्यात आलं. आपल्याला अनेक केसेसमध्ये योग्य पुराव्याअभावी आरोपी सुटताना दिसतात, पण आता तसं होणार नाही. त्याच ठिकाणी या किटच्या माध्यमातून 100 टक्के प्राथमिक आणि अंतिम निष्कर्ष घटनास्थळी काढता येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. जवळपास 256 व्हॅन्स आम्ही तयार करणार आहोत, 21 व्हॅन्स सध्या रोलआऊट केलेल्या आहेत. सगळ्या व्हॅन्स रोलआऊट होऊन सगळीकडे उपलब्ध होतील,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

योग्य प्रकारची व्यवस्था करणं, त्याचं स्टोरेज करणं याचे काही नवीन नियम सुरू केले आहेत. त्या नियमाअंतर्गत महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे, जिथे त्याला अनुकूल अशा मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन तयार केल्या आहेत. या प्रत्येक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य असणार आहे, तिथे साइंटिफिक ॲनालिस्ट आणि केमिकल ॲनालिस्ट ज्यांना फॉरेन्सिक एक्स्पर्टचा दर्जा आहे, ज्यांचं सर्टिफिकेशन झालंय, ते या व्हॅनमध्ये उपस्थित असतील. क्राईम सीनवर जाऊन तो ताब्यात घेऊन, तेथील जो पुरावा, एव्हिडन्स असेल तो ते जमा करतील, त्यामध्ये ब्लड सॅम्पल, नार्कोटिक सॅम्पल, एखाद्या स्फोटाचे सॅम्पल असू शकतं. त्या प्रत्येकाचं जागेवर टेस्टिंग करण्याचे किट उपलब्ध आहे. आपल्याला अनेक केसेसमध्ये योग्य पुराव्याअभावी आरोपी सुटताना दिसतात, पण आता तसं होणार नाही. त्याच ठिकाणी या किटच्या माध्यमातून 100 टक्के प्राथमिक आणि अंतिम निष्कर्ष घटनास्थळी काढता येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आता पुराव्यांशी छेडछाड करता येणार नाही

या वेगवेगळ्या इक्विपमेंटमधून जे पुरावे जमा होतील, जे स्टोअर करण्यासाठी ब्लॉकचेनची पद्धत तयार करण्यात आली आहे. कोर्टात अनेक दिवस केस सुरू असते, पण त्या वेळी लक्षात येत की जो पुरावा होता तो बदलला आहे, तो पुरावा टॅम्पर झाला आहे, पुराव्यात अडचणी आहेत. पण ब्लॉकचेन पद्धतीमुळे एखाद्या घटनेतील पुरावा कोणालाच टॅम्पर करता येणार नाही. त्यामुळे अतिशय सबळ आणि सायंटिफिक पुरावा उपलब्ध असेल. या सर्व व्हॅन्समध्ये सीसीटीव्ही तसेच फ्रीजही आहे. जेणेकरून एखादा पुरावा, इक्विपमेंट्स किंवा ॲनालिसीस करण्याची केमिकल्स यांचे योग्य टेम्परेचर मेंटेन करता येईल. सगळं योग्य प्रकारे सील होतंय की नाही त्यावर कॅमेऱ्यातून लक्ष ठेवता येईल. कुठेही एखाद्या आरोपीला पळवाट काढता येणार नाही.

एखाद्या रेपच्या केसमध्ये सीमेन कलेक्शन असेल , ब्लड सॅम्पल असेल किंवा डीएनए चाचणीसाठी साइंटिफिक कलेक्शन असेल तर असं कुठलंही कलेक्शन या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून करता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. गुन्हे उघडकीस येणं आणि त्या गुन्हेगारांना शिक्षा होणं या दोन्हीमध्ये गुणात्मक बदल आपल्याला पहायला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जवळपास 256 व्हॅन्स आम्ही तयार करणार आहोत, 21 व्हॅन्स सध्या रोलआऊट केलेल्या आहेत. सगळ्या व्हॅन्स रोलआऊट होऊन सगळीकडे उपलब्ध होतील,असे त्यांनी नमूद केलं. महाराष्ट्रात अपराध सिद्धीचा तयार दर वाढवता येईल आणि अपराध्याच्या मनात भीती निर्माण करता येईल असेही ते म्हणाले.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?