AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मान्सूनबाबत आनंदाची बातमी; जे 16 वर्षांत नाही घडलं ते आता होणार, हवामान विभागाचा नवा अंदाज काय?

यंदा मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून पावसाबाबत मोठी अपडेट देण्यात आली आहे.

मान्सूनबाबत आनंदाची बातमी; जे 16 वर्षांत नाही घडलं ते आता होणार,  हवामान विभागाचा नवा अंदाज काय?
| Updated on: May 20, 2025 | 10:01 PM
Share

अवकाळी पावसानं महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे, पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  अवकाळी  पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, मोठं नुकसान झालं आहे. तर काही भागांमध्ये दुर्घटना देखील घडल्या आहेत.

दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे लवकरच मान्सूनची केरळमध्ये एन्ट्री होणार आहे. मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्यानं (IMD)  वर्तवलेल्या अंदाजानुसार  नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन पुढील चार ते पाच दिवसांत केरळमध्ये होण्याची शक्यता आहे. दर वर्षी एक जूनला मान्सूनचं केरळमध्ये आगमन होतं. मात्र यावर्षी एक जूनच्या आधीच केरळमध्ये पावसाचं आगमन होण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाला अनुकून परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.  जर हा अंदाज खरा ठरला, तर 2009  नंतर पहिल्यांदाच वेळेआधी केरळात मान्सूनच आगमन होणार आहे. 2009  साली 23 मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाला होता. त्यानंतर आता पहिल्यांदाच केरळमध्ये मान्सूनची लवकर एन्ट्री होण्याची शक्यता आहे.

कोकणाला रेड अलर्ट  

दरम्यान पुढील 48 तास धोक्याचे आहेत. हवामान विभागाकडून कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या बुधवारी कोकणात हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.  मुंबईमध्ये आज अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू असून, उद्या देखील मुंबईला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज पुण्यात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली, अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान