AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई त्याला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायची आहे, तोच फोन ठरला शेवटचा, काही तासातच तरुणीचा मृत्यू, मैत्रिणीने थेट..

नुकताच एक मोठी माहिती पुढे आली, ज्यानंतर एकच खळबळ उडाली. मुलीला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी गोळ्या दिल्या आणि त्यानंतर काही तासातच तिचा जीव गेला, असा गंभीर आरोप करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

आई त्याला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायची आहे, तोच फोन ठरला शेवटचा, काही तासातच तरुणीचा मृत्यू, मैत्रिणीने थेट..
Baramati incident
| Updated on: Aug 11, 2026 | 2:33 PM
Share

पुण्यात घडलेल्या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. प्रियकर आणि होणाऱ्या नवऱ्याकडून दिल्या जाणाऱ्या गोळ्यामुळे चक्क 23 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय. एका 23 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला. या मुलीने अगोदर आपल्या आईला फोन केला आणि काही तासातच तिचा मृत्यू झाला. आईला फोन करून तिने सांगितले की, अथर्व त्याच्या घरी मला घेऊन जात आहे आणि गोळी खाण्यास देणार आहे, त्याला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायची आहेत. मुलीचे हे शब्द ऐकताच आईने मुलीला ताबडतोब घरी येण्यास सांगितले. ज्यावेळी मुलगी हे सर्व आईला सांगत होती, त्यावेळी ती अथर्व याच्याच गाडीत होती. आईने मुलीला सांगितले की, तिकडे न जाता आपल्या घरी ये. मात्र, त्यानंतर काही वेळातच मुलीच्या मृत्यूची बातमी आली.

6 ऑगस्ट रोजी मुलगी अथर्व याच्यासोबत फिरण्यासाठी बाहेर गेली होती. काही दिवसांपासून मुलगी शांत शांत राहत असल्याचेही तिच्या आईच्या लक्षात आले होते. हेच नाही तर अथर्व याच्याकडून मुलीला गोळ्या दिल्या जात असल्याची माहिती मुलीच्या आईला तिच्या मैत्रिणीने दिली. मुलगी 10 ते 12 दिवसांपासून शांत राहत असल्याचे आईच्या लक्षात आल्यानंतर आईने मुलीच्या मैत्रिणींना याबाबत विचारले, यावर मैत्रिनींनी सांगितले की, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी अथर्व तिला आग्रह धरत आहे.

त्यानंतर अथर्व तिला घेऊन बारामतीच्या कॉलेजमध्ये गेला. त्यानंतर मुलीने अथर्वच्या घरी जात असल्याचे आईला सांगितले तो शारीरिक संबंध ठेवण्याचे बोलत आहे. यानंतर आईने मुलीला दोन वेळा फोन केला पण तिने उचलला नाही. आईने अथर्वच्या मोबाईलवर फोन केला तर तिच्या मुलीशी बोलणे झाले. या प्रकरणात मुलीच्या आईने आरोप करत अथर्व मेहन वय 27 विरोधात गुन्हा दाखल केला. मुलीचे आणि अथर्व यांचे प्रेमसंबंध होते, दोघांच्या कुटुंबियांच्या सहमतीने लग्न ठरवले होते.

अथर्व आणि मुलगी एकमेकांच्या संपर्कात होते आणि फोनवरून नियमित संपर्कात होते. मात्र, अथर्व याच्याकडून आपल्या मुलीला गोळ्या दिल्या जात आहेत, याबद्दल काही दिवसांपूर्वीच मुलीच्या आईला कल्पना आली. बारामती शहर पोलिस स्टेशनमध्ये गु.र.नं. 325/2026, भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 106(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीने अथर्वकडून दिल्या जाणाऱ्या गोळ्या खाण्यास नकार देण्यात आला. याच गोळ्यामुळे मुलीची प्रकृती बिघडल्याचा आरोप मुलीच्या आईकडून करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांकडून तपास केला जात आहे.

Follow Us
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना