AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KBC 18 : आयव्ही लीग ग्रॅज्युएटही अडखळला ! रामायणाच्या प्रश्नाचं उत्तर न आल्याने गमावले 25 लाख, तुम्हाला माहित्ये का उत्तर ?

'कौन बनेगा करोडपती 18' मध्ये एक स्पर्धक 25 लाखांच्या प्रश्नावर अडकला. रामायणाशी निगडीत या प्रश्नाच उत्तर न देता आल्याने त्याने गेम क्विट केला. तुम्हाल माहीत आहे का याचं उत्तर ?

KBC 18 : आयव्ही लीग ग्रॅज्युएटही अडखळला ! रामायणाच्या प्रश्नाचं उत्तर न आल्याने गमावले 25 लाख, तुम्हाला माहित्ये का उत्तर ?
KBC 18
| Updated on: Sep 25, 2026 | 3:46 PM
Share

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) गेल्या कित्येक वर्षांपासून ‘कौन बनेगा करोडपती ‘ (KBC) हा लोकप्रिय क्विझ शो होस्ट करत असून सध्या या शोचा 18 वा सीझन सुरू आहे. प्रेक्षक खूप उत्सुकतेने हा शो बघत असतात. नुकताच दिल्लीचा एक स्पर्धक अमन शर्मा या शोच्या हॉटसीटवर बसला. अननने अमेरिकेत आयव्ही लीग युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिलव्हेनिया मधून ग्रॅज्युएशन केलंय. बिग बी यांनी एकामागोमाग एक विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी पटापट उत्तरं देत शानदार गेम खेळला. पण 25 लाखांच्या प्रश्नांवर तो अडकला. विशेष म्हणजे हा प्रश्न रामायणाशी निगडीत होता.

पण अमनला त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही आणि त्याने गेम क्विट करण्याचा निर्णय घेतला. अखेर तो 12.5 लाख रुपये घेऊन घरी परतला. अमन ज्या प्रश्नावर अडकला तो सवाल अखेर होता तरी काय आणि त्याच उत्तर काय होतं ? तुम्हाला माहीत आहे का ?

काय होता प्रश्न ?

वाल्मीकि रामायण नुसार, भरत याच्यासोबत त्याच्या आजोबांच्या घरी कोणता मामा गेला होता ?

या प्रश्नासाठी ऑप्शन्स होते –

शूरसेना, युधाजित, पञ्चशिख, जापक

तुम्हाला माहीत आहे का योग्य उत्तर ?

25 लाखांसाठी विचारण्यात आलेल्य या प्रश्नाचं उत्तर अमनला माहीत नव्हतं, त्यामुळे त्याने गेम सोडण्याचा निर्णय घेतला आणि जिंकलेल्या 12.5 लाखांवर समाधान मानलं. त्याने हा खेळ क्विट केल्यावर अमिताभ बच्चन यांनी त्याला एक ऑप्शन निवडण्यास सांगितलं. त्याने शूरसेना हाँ पर्याय निवडला मात्र ते चुकीचं होतं. या प्रश्नाचं योग्य उत्तर – युधाजित आहे – असं बिग बी यांनी त्याला सांगितलं.

कोण असणार पुढले गेस्ट ?

अभिनेता राजकुमार राव आणि वामिका गब्बी लवकरच ‘कौन बनेगा करोडपती 18’ मध्ये दिसणार आहेत. ‘प्रहार’ या त्यांच्या अपकमिंग चित्रपटाच्या शूटिंगसाठी ते लौकरच तिथे येणार आहे. यादरम्यान राजकुमार राव आणि वामिका हे दोघे अमिताभ बच्चन यांच्यासोबत मजा-मस्ती करताना दिसणारा आहे. ‘कौन बनेगा करोडपती 18’ हा शो सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता सोनी टीव्हीवर पाहता येऊ शकतो. तसेच सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्वर देखील प्रेक्षकांना हा शो पाहता येईल.

Follow Us
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना