Diwali Air Pollution: दिवाळीत प्रदूषणाचा ‘बॉम्ब’, फटक्यांनी मुंबईचा श्वास कोंडला, देशभरात हवेची गुणवत्ता इतकी खालावली
Diwali Air Pollution: दिवाळीत फटक्यांमुळे अनेक शहरांचा श्वास कोंडला आहे. देशभरात प्रदूषणाची भीषण परिस्थिती आहे. हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. हवा गुणवत्ता निर्देशांकाच्या (एक्यूआय) जागतिक क्रमवारीत सोमवारी सर्वात प्रदूषित १०० शहरांत ९३ भारतीय शहरे होती.

Diwali Air Pollution: दिवाळीत देशभरामध्ये प्रदूषणाची परिस्थिती गंभीर आहे. फटाक्यांमुळे झालेल्या प्रदूषणामुळे राजधानी दिल्लीसह देशभरातील हवेची गुणवत्ता कमालीची ढासळली आहे. हवा गुणवत्ता निर्देशांकाच्या (एक्यूआय) जागतिक क्रमवारीत सोमवारी सर्वात प्रदूषित १०० शहरांत ९३ भारतीय शहरे होती. बहुतांश शहरांत हवेची गुणवत्ता ‘अतिवाईट’ श्रेणीत गेली. रविवारी हवेच्या २१७ इतक्या सरासरी निर्देशांकासह नागपूर हे राज्यातील सर्वात प्रदूषित शहर ठरले तर, सोमवारी पिंपरी-चिंचवडने तो मान पटकवला. या शहरात हवेची गुणवत्ता ३०३ इतकी नोंदवण्यात आली. त्याखालोखाल पुण्यात २९४ ‘एक्यूआय’ची नोंद झाली. मुंबईत हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरी १७२ इतका (वाईट श्रेणी) नोंदवला गेला. मात्र, अनेक उपनगरांमध्ये तो २०० ते २५० च्या दरम्यान होता.
पुण्यात दिवाळीच्या काळात वाढलं वायू प्रदूषण
पुण्याची हवा दिवाळीच्या काळात अतिवाईट श्रेणीत पोहचली. शहरात सगळीकडे धुरकट वातावरण पाहायला मिळाला तर पिंपरी चिंचवड मध्ये सर्वाधिक प्रदूषण झालं आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या मानकापेक्षा तीन पट खराब हवा नोंदवण्यात आली आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक २४९ म्हणजे अटीवाईट श्रेणीत आहे
रत्नागिरी- फटाक्यांमुळे कोकणातही AQI मध्ये वाढ
रत्नागिरी जिल्ह्यातील सुद्धा हवेतील गुणवत्ता खालावली. मध्यरात्री फटाके फोडल्यामुळे हवेची गुणवत्ता ३४७ AQI वर गेली होती. मात्र हवा मोकळी झाल्यानंतर हवेची गुणवत्ता पुन्हा 89 AQI वर आली. रत्नागिरी जिल्ह्यात हवेची गुणवत्ता हr सरासरी 70 AQI एवढी असते. समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे फटाक्यांचा धूर लवकर पळवून लावला गेला. काही तासांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील हवा फटाक्यामुळे दूषित झाली होती. गेल्या दोन दिवसात वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात झाल्याचे समोर आले. 8 नोव्हेंबरच्या रात्री 3.30 मिनिटांनी एक्यूआय हा 347 वर पोहचला होता. हवेत तरंगणारे अतिसुक्ष्म प्रदुषणकारी कण म्हणजे pm2.5 याचे प्रमाण जास्त होते. 76 वरचा एक्यूआय हा थेट 347 वर पोहचला होता, रात्री पुरता एक्यूआय खराब मात्र सकाळनंतर पुन्हा हवा स्वच्छ झाली.
देशातील १४ शहरांमध्ये प्रदूषाणाची पातळी अत्यंत वाईट
दोन वर्षांपूर्वीच्या दिवाळीत देशातील १४ शहरांमध्ये प्रदूषाणाची पातळी अत्यंत वाईट होती. नेचर नियतकालिकात प्रसिद्ध लेखानुसार, जमिनीवरील वायुप्रदूषण निरीक्षण केंद्रे, उपग्रहांआधारे माहिती आणि हवामानाविषयक आकडेवारीनुसार, फटाके फोडल्यानंतर हवेत अतिसुक्ष्म आणि विषारी कण होते. ते डोळ्यांनी दिसत नसले तरी श्वसनाद्वारे शरीरात जाण्याची शक्यता अधिक असतेत. त्यावेळी १४ शहरांमध्ये PM2.5 आणि PM10 या घातक कणांचे प्रमाण मर्यादेपेक्षा ३ ते १० पट अधिक असल्याचे समोर आले. दिवाळीत काही शहरांमध्ये हे प्रमाण १९ टक्क्यांनी अधिक असल्याचे समोर आले.
मालवणी मध्ये भीषण आग, १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
मुंबईतील मालाड पश्चिम येथे भीषण आग लागून एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मालाड मालवणी, गेट नंबर ०८, अब्दुल हमीद मार्ग, मालाड पश्चिम येथे घडली. तळमजल्यावरील एका दुकानात फटाके, इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन यांना आग लागली होती. आग सुमारे २० बाय ३० फुटाच्या परिसरात पसरली होती. फटाक्यांच्या स्फोटामुळे दुकानाचा स्लॅब कोसळला. बेपत्ता असलेला मुलगा नंतर दुकानाच्या आत मृतावस्थेत सापडला. त्याचे शरीर पूर्णपणे जळाले होते. त्याला खाजगी रुग्णवाहिकेतून बीएमसीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेत मृत झालेल्या मुलाचे नाव शनवाज नियाज खान, वय १६ वर्षे असे आहे.
