HemantPatil: ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी बंडाखोरांना हेमंत पाटलांनी फूस लावली; माजी खासदार सुभाष वानखेडेंची जहरी टीका

| Updated on: Aug 09, 2022 | 5:53 PM

येत्या काही दिवसात हा वाद शिगेला पोहचणार असल्याचे बोलले जात आहे. शिंदे-फडणवीस सरकारमधील काही मंत्र्यांनी आज शपथ घेतली असतानाच वानखेडे यांनी पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ईडीपासून वाचण्यासाठी त्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले असल्याची टीकाही त्यांच्यावर करण्यात आली आहे

HemantPatil: ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी बंडाखोरांना हेमंत पाटलांनी फूस लावली; माजी खासदार सुभाष वानखेडेंची जहरी टीका
Follow us on

नांदेडः नोटबंदीत काळ्याचा पांढरा पैसा करून खासदार हेमंत पाटील (MP Hemant Patil) यांनी प्रचंड कमाई केली आहे, त्यामुळे त्यांनी ईडीच्या (ED) कारवाईपासून वाचण्यासाठी बंडाखोरांना फूस लावली असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे (Former MP Subhash Wankhede)  यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर वानखेडे यांनी आज पत्रकार परिषद घेत ओल्या दुष्काळाच्या मागणीसाठी 15 ऑगस्टनंतर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. यावेली माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी मुख्यमंत्र्यांकडून ओल्या दुष्काळाची पाहणी करण्यात आली नाही त्यामुळे त्यांच्यावरही जोरदार टीका करण्यात आली आहे. तसेच काल शिंदे गटात गेलेल्या जिल्हाप्रमुखांसह खासदार हेमंत पाटील यांच्यावर वानखेडे यांनी काळा पैसा पांढरा करण्यावरून जहरी टीका करण्यात आली आहे.

माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी खासदार हेमंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केल्याने आता स्थानीक राजकारण तापणार असल्याचे दिसत आहे.

रस्त्यावरच्या टुकाराला खासदार केलं

हेमंत पाटील यांच्यावर टीका करण्यात आल्यानंतर आता हेमंत पाटील या टीकेला काय प्रत्युत्तर देतात त्याकडे साऱ्यांचे लागून राहिले आहे. मागील महिन्यात सुभाष वानखेडे यांनी खासदार हेमंत पाटील यांच्यावर रस्त्यावरच्या टुकाराला खासदार केलं अशी जहरी टीका त्यांच्यावर करण्यात आली होती, त्यावेळी त्यांच्या वाक्ययुद्ध प्रचंड रंगले होते.

पाटलांव तोफ डागली

विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात झालेल्या बंडखोरी नाट्यामुळेच सुभाष वानखेडे यांनी खासदार हेमंत पाटील यांच्यावर सडेतोड टीका केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला आहे, त्याचदिवशी माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी हेमंत पाटलांवर तोफ डागली आहे.

हा वाद शिगेला पोहचणार

त्यामुळे येत्या काही दिवसात हा वाद शिगेला पोहचणार असल्याचे बोलले जात आहे. शिंदे-फडणवीस सरकारमधील काही मंत्र्यांनी आज शपथ घेतली असतानाच वानखेडे यांनी पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ईडीपासून वाचण्यासाठी त्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले असल्याची टीकाही त्यांच्यावर करण्यात आली आहे.