AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पवार साहेबांचा दम म्हणजे…’ निलेश लंकेंनी सांगितला खास किस्सा, शरद पवारांनाही आलं हसू

आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा २६ वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. या भाषणात खासदार निलेश लंके यांनी एक किस्सा सांगितला. तो ऐकल्यावर शरद पवारही खळखळून हसले.

'पवार साहेबांचा दम म्हणजे...' निलेश लंकेंनी सांगितला खास किस्सा, शरद पवारांनाही आलं हसू
Nilesh Lanke Speech
| Updated on: Jun 10, 2025 | 11:04 PM
Share

पुण्यात आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा २६ वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला पक्षातील आमदार खासदारांसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पक्षातील अनेक नेत्यांनी भाषणे केली. मात्र अहिल्यानगचे खासदार निलेश लंके यांचे भाषण सर्वात जास्त गाजले. या भाषणात खासदार निलेश लंके यांनी एक किस्सा सांगितला. तो ऐकल्यावर शरद पवारही खळखळून हसले. तो किस्सा काय होता ते जाणून घेऊयात.

निलेश लंकेंनी सांगितला किस्सा

निलेश लंकेंनी शरद पवार कसा दम देतात याचा किस्सा सांगितला. लंके म्हणाले, ‘पवार साहेबांचा दम हा “ये तुला पाहुन घेतो” असा तुमच्याआमच्यासारखा नाही. साहेब म्हणतात “तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने वागले तर आम्हाला विचार करावा लागेल”, याच्यात लय दम आहे.माझ्यासमोर साहेबांनी एका हस्तीला सांगितलं होतं की, लंके हा माझा कार्यकर्ता आहे. तो लोकवर्गणीतून विधानसभेची निवडणूक लढवत आहे, त्याला जर चुकीच्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण, त्यानंतर तो काही महिनाभर झोपला नसेल.” हा किस्सा ऐकून शरद पवारही खळखळून हसले.

शरद पवार ५५ वर्षांपासून देशाच्या राजकारणात

पुढे बोलताना निलेश लंके म्हणाले की, साहेब हसले का आणि ते गप्प का हे समजत नाही. साहेब हसलेलं हे कळालं तर टांगेखालून जाईल आणि गप का हे समजलं तर लोटांगण घालेन. हे कुणाला समजलं नाही म्हणून साहेब ५५ वर्षांपासून देशाच्या राजकारणात टिकून आहेत असंही लंके यांनी म्हटलं.

आपण हाफ चड्डीवर फिरत होतो तेव्हा पवार साहेब… 

आपल्या भाषणात पुढे बोलताना लंके यांनी सांगितलं की, ‘राजकारणामध्ये कधी दिवस बदलतील सांगता येत नाही. काहींना लय घाई झाली. आपला नेता आहे ना, आपलं वय नाही तेवढा नेत्याचा अनुभव आहे. नेत्याला सगळी गणित जुळतात, आपण हाफ चड्डीवर फिरत होतो तेव्हा आपला नेता महाराष्ट्राचं नाहीतर देशाचं राजकारण करत होता.’

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत