AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओमराजे निंबाळकर यांचा अत्यंत मोठा निर्णय, शिंदेंना धक्का?, थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या..

ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांच्या हत्याकांडाचा निकाल आज लागला. सर्व आरोपींची निर्दाेष मुक्तता करण्यात आली. त्यामध्येच आता ओमराजे निंबाळकर यांनी मोठे संकेत दिले. त्यांच्या बंडखोरीसोबतच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दलही बोलताना ते दिसले.

ओमराजे निंबाळकर यांचा अत्यंत मोठा निर्णय, शिंदेंना धक्का?, थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या..
Omraje Nimbalkar
| Updated on: Jun 21, 2026 | 6:51 AM
Share

पवनराजे निंबाळकर प्रकरणाचा निकाल आला. या निकालात सर्व आरोपींना निर्दाेष मुक्तता देण्यात आली. हा ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी मोठा धक्का आहे. गेल्या 20 वर्षांपासून न्यायासाठी ओमराजे निंबाळकर झगडत आहेत. न्याय देवतेवर विश्वास असल्याचे त्यांनी निकालापूर्वीच म्हटले होते. मात्र, त्यांना मोठा दणका बसला. कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितले की, पुराव्या अभावी आरोपींची निर्दाेष सुटका होतंय. या निकालानंतर तात्काळ tv9 सोबत बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले की, ते या प्रकरणात दिल्लीच्या कोर्टात जाणार आहे. सुरूवातीला हा प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे होता. मुंबई पोलिसांवर दबाव होता. त्यानंतर सीबीआयकडे हा निकाल वर्ग करण्यात आला. सीबीआयवरही दबाव होता. पवनराजे निंबाळकर प्रकरणात 20 वर्षांनी निकाल आल्यानंतर धाराशिवमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला धक्का देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. पक्षाने व्हिप जारी केल्यानंतरही ओमराजे निंबाळकर बैठकीला हजर नव्हते. लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी दिलेल्या पत्रात ओमराजे निंबाळकर यांच्या नावाचा उल्लेख आहे. मात्र, ओमराजे निंबाळकर यांनी कोर्टाच्या निकालानंतर म्हटले की, राजकीय भूमिकेबाबत मतदारसंघात जाऊन दोन ते तीन दिवसात निर्णय घेणार.

सहन केल्यावर आम्हाला न्यायाची अपेक्षा होती. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. मी माझी राजकीय भूमिका मतदार संघात गेल्यावरच स्पष्ट करेल. पुढे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले की, माझा निर्णय काही असला तरी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे साहेब यांच्याबद्दल कधीच बोललो नाही बोलणार नाही. मतदारसंघात जाऊन माझी भूमिका नक्की कळवेल.

माझी राजकीय भूमिका काहीही असली तरीही मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल बोलणार नाही, यापूर्वीही बोललो नाही आणि भविष्यातही बोलणार नसल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले. ओमराजे निंबाळकर नक्की काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. 5 खासदारांचे भविष्य यावरच आहे. शिवसेना ठाकरे गटातून ओमराजे निंबाळकर यांनी बंडखोरी केलीये.

Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल