AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना ठाकरे गटातील फुटीनंतर पहिल्यांदाच खासदार संजय जाधव समोर, नेमकं काय म्हणाले?

परभणीच्या यशवाडीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे, सभा मंडप कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय जाधव यांनी या घटनेतील जखमी व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत.

शिवसेना ठाकरे गटातील फुटीनंतर पहिल्यांदाच खासदार संजय जाधव समोर, नेमकं काय म्हणाले?
sanjay jadhavImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 20, 2026 | 7:06 PM
Share

परभणीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. परभणीमधील यशवाडीमध्ये हनुमान मंदिराच्या परिसरात सभामंडप कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत 30 – 40 भाविक जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच याठिकाणी बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. या घटनेत 7 ते 8 भाविक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर परभणीचे खासदार संजय जाधव यांनी या घटनेची माहिती दिली आहे. पदाधिकाऱ्यांशी संर्पक साधून तातडीने घटनास्थळी मदत पोहोचवण्याच्या सूचना दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले संजय जाधव? 

परभणी जिल्ह्यातील जागृती देवस्थान यशवाडी याठिकाणी मोठी दुर्घटना घडली आहे. अर्धवट बांधकाम झालेला सभामंडप कोसळला आहे. या दुर्घटनेत अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे, काही लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे, काही लोक हे अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या घटनेत काही लोकांनी आपला जीव गमावला आहे. दुर्घटना मोठी आहे, मी सर्व पदाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि सर्वांना आवाहन करतो, की या दुर्घटनेत जे जखमी लोक आहेत, त्यांना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्यावी, जखमी लोकांवर तातडीने उपचार सुरू करावेत. तुम्हाला कोणतीही मदत लागली तर सर्व प्रकारची मदत तातडीने उपलब्ध करून दिली जाईल, सर्वांनी या कठीण प्रसंगात सहकार्य करावं असं यावेळी बंडू जाधव यांनी म्हटलं आहे.

6 जणांचा मृत्यू  

दरम्यान या दुर्घटनेत सभा मंडपाखाली अडकल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर सात ते आठ जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे, हा सभा मंडप कोसळून त्यामध्ये 30 ते 40 जण दबले गेले होते, त्यातील काही जणांना बाहेर काढण्यात आलं आहे, तर उर्वरीत लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. सभा मंडप कोसळतानाची घटना  सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Follow Us
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली