MPSC Exam 2021 New Date: एमपीएससी परीक्षा 21 मार्चला होणार; विद्यार्थी निर्णय मान्य करणार?

आता ही परीक्षा 14 मार्चऐवजी 21 मार्चला म्हणजे रविवारी होणार आहे.  |MPSC Exam

MPSC Exam 2021 New Date: एमपीएससी परीक्षा 21 मार्चला होणार; विद्यार्थी निर्णय मान्य करणार?
एमपीएसी
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 11:39 AM

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षेची (MPSC exam) नवी तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आता ही परीक्षा 14 मार्चऐवजी 21 मार्चला म्हणजे रविवारी होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुरुवारी 14 मार्च रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली होती. MPSC ची परीक्षा पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले होते. त्यामुळे पुण्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये MPSC चे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. आता हे विद्यार्थी सरकारचा 21 मार्च रोजीचा निर्णय स्वीकारणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.   (MPSC exam will be reschedule on 21 March 2021)

या परीक्षेसाठी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शहरातील केंद्रांच्या ठिकाणी वास्तव्याला येऊन राहिले आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना राहण्याचा आणि खाण्याचा खर्च करावा लागत आहे. मात्र, परीक्षा पुढे ढकलल्याने या विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल. त्यामुळे विद्यार्थी 21 तारखेच्या परीक्षेचा निर्णय कितपत मान्य करणार, हे आता पाहावे लागेल. मुळात सरकारने 21 तारखेला परीक्षा घेण्याच्यादृष्टीने तयारी केली असले तर मग ती 14 तारखेला का होऊ शकत नाही, असा सवाल अनेक विद्यार्थी विचारत आहेत. काहीवेळापूर्वीच MPSC विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे आता सरकारच्या निर्णयावर भाजप पक्ष काय भूमिका घेणार, हेदेखील पाहावे लागेल.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

येत्या आठ दिवसांत ही परीक्षा घेणारच, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ही घोषणा करताना शासकीय यंत्रणा आणि तिच्या तयारीपद्दलही मुख्यमंत्री बोलले. मग ही परीक्षा होताना शासकीय यंत्रणेची परीक्षेची तयारी, सुपरव्हिजन करणारे शिक्षक, वर्गखोल्या, त्यात सुरु असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आदी विषयांवर मुख्यमंत्री बोलले.

आपल्याला कल्पना असेल या परीक्षेला संपूर्ण शासकीय यंत्रणा लागते. विद्यार्थ्यांची सोय करण्यापासून पेपर गोळा करुन गठ्ठे बांधण्यापर्यंत नियोजन करावं लागतं.त्यासाठी कर्मचाऱ्यांची तयारी करुन घ्यावी लागणार आहे. कोरोनाचा राक्षस पुन्हा डोकं वर काढतोय. त्यामुळे जे कर्मचारी परीक्षेसाठी काम करणार आहेत त्यांची टेस्ट केली जाणं महत्त्वाचं आहे. ज्यांना लस दिली गेली तेच कर्मचारी यासाठी काम करतील, असा माझा आग्रहच नाही तर सूचना आहे. विद्यार्थी परीक्षेत आल्यानंतर कोणत्याही दडपणात राहू नयेत’, अशी सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.

हे ही वाचा :

MPSC Exam new Dates : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा,परीक्षा 8 दिवसात

MPSC Exam: मुख्यमंत्र्यांना प्रशासकीय विषय कळत नाहीत, ते केवळ वेळ मारुन नेतात: चंद्रशेखर बावनकुळे

(MPSC exam will be reschedule on 21 March 2021)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.