AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC Paper Leak : जो पेपरफुटीचा मास्टरमाईंट त्यालाच उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार! अमृत पाटीलबाबत चकित करणारी नवी माहिती

पेपरफुटी प्रकरणात ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील यांचा सर्वात मोठा सहभाग असल्याचे समोर आले आहे. अमृत पाटील हे नंदुरबारच्या परिवर्धा जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.

MPSC Paper Leak : जो पेपरफुटीचा मास्टरमाईंट त्यालाच उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार! अमृत पाटीलबाबत चकित करणारी नवी माहिती
mpsc paper leak newsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 27, 2026 | 5:14 PM
Share

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्ररणात रोजच नवनवे आणि धक्कादायक असे खुलासे होत आहेत. प्रेमप्रकरण आणि नंतर झालेले ब्रेकअप यातून हा पेपरफुटीचा घाट रचला गेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आतापर्यंत या प्रकरणात अनेक बड्या सरकारी अधिकाऱ्यांसह पेपरफुटीतील दलाल तसेच इतर आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेत पेपरफुटीचा हा प्रकार घडला होता. दरम्यान, आता या प्रकरणात आरोपी असलेले अमृत पाटील यांच्याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुलीसाठी एमपीएससीचा पेपर फोडल्याचा आरोप

पेपरफुटी प्रकरणात ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील यांचा सर्वात मोठा सहभाग असल्याचे समोर आले आहे. अमृत पाटील हे नंदुरबारच्या परिवर्धा जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. अमृत पाटील यांना राज्य शासनाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देखील मिळाला होता. मात्र, याच उत्कृष्ट शिक्षकाने आपल्या मुलीसाठी एमपीएससीचा पेपर फोडल्याचा आरोप समोर आले आहे. ही पेपरफुटी करताना नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांना अमृत पाटील यांनी लाखो रुपये देऊन प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचे समोर आले आहे.

राज्य शासनाकडून मिळाला उत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार

अमृत पाटील यांनी प्रश्नपत्रिका मिळवल्यानंतर ती केवळ आपल्या मुलीलाच दिली होती की इतरांनाही उपलब्ध करून दिली होती, याचा आता तपास केला जात आहे. राज्य शासनाकडून उत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार मिळवलेल्या व्यक्तीवरच शिक्षकपदाला कलंक लावला असे म्हणत संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणात आणखी काही जणांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.

लव्हस्टोरीचा अँगल नेमका काय?

या प्रकरणातील आरोपी ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांचे एकमेकांवर प्रेम होते. परंतु ब्रेकअप झाल्याने गौरव पाटील यानेच एमपीएससीला पेपरफुटी झाल्याचे सांगितले होते. ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील यांनी पेपर फोडण्यासाठी प्रवीण पाटील या दलालाची मदत घेतली होती. ऋतुजाने हाच पेपर प्रेमापोटी गौरव पाटीलालाही दिला होता. ऋतुजा या पेपरमध्ये पास झाली होती. परंतु ऋतुजा आणि गौरव यांच्यात वाद झाल्यानंतर गौरवनेच एमपीएससीकडे ऋतुजाविरोधात तक्रार केली होती.

Follow Us
जत तालुक्यात पाणीटंचाई आणि इतर मागण्यांसाठी सर्वपक्षीय रास्ता रोको...
जत तालुक्यात पाणीटंचाई आणि इतर मागण्यांसाठी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन
सुप्रिया सुळेंची खासदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसोबत बैठक,
सुप्रिया सुळेंची NCP खासदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसोबत बैठक, नेमकं कारण काय?
सुप्रिया सुळेंवर आरोप करण्याचा हेतु नव्हता, वडेट्टीवारांची दिलगीरी
सुप्रिया सुळेंवर आरोप करण्याचा हेतु नव्हता, विजय वडेट्टीवारांची दिलगीरी
सतेज पाटील आणि भाजप समर्थक शिवाजी पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
सतेज पाटील आणि भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
आरोपी सुनील गाडवे हा रोहित पवारांचा उजवा हात; एमपीएससी पेपरफुटी...
आरोपी सुनील गाडवे हा रोहित पवारांचा उजवा हात; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी बड्या नेत्याचा मोठा दावा
जिथे हिमनदी फुटली, महाप्रलय आला; तिथे पोहोचलं चीनचं हेलिकॉप्टर, थरारक
Nepal Flood : जिथे हिमनदी फुटली, महाप्रलय आला; तिथे पोहोचलं चीनचं हेलिकॉप्टर, थरारक VIDEO
दोन जणांनी गमावला जीव, विमानाचा तर अगदी चुरा झाला; भीषण अपघात...
दोन जणांनी गमावला जीव, विमानाचा तर अगदी चुरा झाला; कानपूरमध्ये विमानाचा भीषण अपघात
मोदींचा युवा खेळाडूंना खास संदेश; 2036 ऑलिम्पिकसाठी भारताची तयारी...
मोदींचा युवा खेळाडूंना खास संदेश; 2036 ऑलिम्पिकसाठी भारत मोठ्या तयारीत, आता...
धारशिवमध्ये बंड करणाऱ्या नगरसेवकाच्या घराबाहेर जोरदार बॅनरबाजी; थेट...
धारशिवमध्ये बंड करणाऱ्या नगरसेवकाच्या घराबाहेर जोरदार बॅनरबाजी; थेट लिहिलं, एक खोका...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट... नवा नियम काय?