AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लायसन्स रद्द होणार नाही, मराठी शिकण्यासाठी रिक्षा चालकांना एक वर्षाची मुदत; मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ जाहीर केली आहे. चालकांच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे या कालावधीत त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. या निर्णयामुळे अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.

लायसन्स रद्द होणार नाही, मराठी शिकण्यासाठी रिक्षा चालकांना एक वर्षाची मुदत; मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
cm devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 27, 2026 | 6:12 PM
Share

राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली. रिक्षा आणि टॅक्सी चालकाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन ही विनंती केली होती. त्यामुळे त्यांना ही मुदतवाढ देण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं. या वर्षभरात अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी शिकलं पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. रिक्षा आणि ऑटो चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आल्याने त्यांच्यावर आता वर्षभर कोणतीही कारवाई होणार नाही. त्यांचं लायसन्सही रद्द होणार नाही.

हाजी अराफत यांच्या नेतृत्वात ऑटो आणि रिक्षा चालकांनी आज माझी भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने जुजबी मराठी आली पाहिजे याचं समर्थन केलं. मराठी शिकण्याचा आमचा प्रयत्नही सुरू आहे. भविष्यातही प्रयत्न करत राहू, असंही त्यांनी सांगितलं. मात्र, वेगवेगळ्या वयातील रिक्षा, टॅक्सी चालकांना कमी वेळात मराठी शिकता येणार नाही. त्यासाठी आम्हाला वेळ द्यावा, अशी त्यांनी विनंती केली. किमान मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे या अमराठी रिक्षा आणि ऑटोचालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

कारवाई होणार नाही

रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षभरात त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. एक वर्षात क्लासेस लावून किंवा मराठी साहित्याचा अभ्यास करून ही संघटना रिक्षा आणि टॅक्सीचालकांना जुजबी मराठी शिकवतील. रिक्षाचालक आणि ऑटो चालकांचं शिष्टमंडळ समोरून आलं. त्यांनी विनंती केली. वेळ वाढवून मागितली. त्यामुळे वेळ देणं आवश्यक होतं. त्यानुसार त्यांना एक वर्षाची मुदत वाढवून दिली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे अमराठी रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Follow Us
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?