Rohit Pawar : वेलकम ब्रो, रोहित पवार मंत्रिमंडळात दिसू शकतात, नितेश राणेंच्या वक्तव्यावर रोहित पवारांचं उत्तर
Rohit Pawar : "पुणेकरांना कळालेलं आहे की, अधिकारी पैसे देऊन अधिकारी होणार असतील तर त्याचा फटका जनतेला सुद्धा बसू शकतो. त्या अनुषंगाने जर या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुणे बंद पडू शकतं"

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी सध्या MPSC विद्यार्थ्यांचा प्रश्न हाती घेतला आहे. त्यासाठी त्यांचं पुण्यात आंदोलन सुरु आहे. या विषयावर आज रोहित पवार बोलले आहेत. “सदस्यांपासून अध्यक्षांपर्यंत सगळ्या लोकांचा तपास विश्वासू लोकांच्या माध्यमातून व्हावा. असं नाहीय की हे कुठं संपवायचं नाहीय, विद्यार्थ्यांची इच्छा आहे की, त्यांना अभ्यास करायचाय. परीक्षेवर लक्ष द्यायचं आहे. दुर्देव असं आहे की, सरकार वेगळं आंदोलन उभं करतय, या आंदोलनाला तडा देण्यासाठी हे सत्ताधाऱ्यांकडून जे केलं जातय ते योग्य नाहीय” असं रोहित पवार म्हणाले. सत्ताधारी शिवसेनेचे जे आमदार आहेत संजय गायकवाड ते म्हणतायत की, शैलेंद्र देवळाणकर आहेत काही लोकांनी पेपर फोडले हजार दीड हजार कोटी कमावले असा आरोप केलाय.
“कसं आहे MPSC आयोग बर्खास्त करुन काही होणार नाहीय. सदस्य निलंबित करुन काही चांगले अधिकारी आणता येतील. आम्ही सरकारला पर्याय दिला आहे. काही चांगले अधिकारी मागितले आहेत. त्यांच्याकडे जे पुरावे आहेत ते त्यांनी द्यावेत. यात कोण कोण कुठपर्यंत घुसलेलं आहे. काही लोकांनी पैसे खाल्लेत, त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे” असं रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार मंत्रिमंडळात जाणार का?
नितेश राणे आलेले ते म्हणाले की, रोहित पवारांना मी शत्रू मानत नाही. ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काम करताय ते मंत्रिमंडळात सहकारी म्हणून दिसू शकतात. “माझे मित्रच आहेत ते. आम्ही बोलत असतो. राजकारणात शत्रू असावं असं नसतं. मतभिन्नता असू शकते. मी त्यांच्या स्टेटमेंटच स्वागत करतो. संवादाच्या माध्यमातून प्रश्न सुटावा अशी इच्छा आहे. मुख्यमंत्री साहेबांना प्रस्ताव दिलेला आहे. त्यांनी तो स्वीकारावा. तो स्वीकारल्यानंतर ज्या-ज्यो लोकांनी पैसे खाल्लेत ते नक्कीच सापडतील. याने संस्थेचं शुद्धीकरण होईल” असं उत्तर रोहित पवार यांनी दिलं.
तर वेलकम ब्रो
“राहिला प्रश्न माझ्या मंत्री बनण्याचा. नितीश भाऊ भाजपमध्ये राहणार नाहीत. ते भाजपं सोडतील. आमच्यासोबत आले तर आपण एकत्र मंत्री म्हणून राहू शकतो. मागच्या 10 वर्षात विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र गाळात गेला आहे. आपण त्याला उंचीवर घेऊन जाऊ शकतो. ते भाजप सोडून आमच्यासोबत आले तर आम्ही मंत्री होऊ शकतो. वातावरण बदलतय. जे पूर्वी काँग्रेसमध्ये होते ते भाजपत गेले. त्यांनी केलेली चूक त्याची जाणीव झालीय. भाजपं सोडून आले तर वेलकम ब्रो”
पुणे बंद पाडणार का?
अभिजीत दीपके बोलतात की, पुणे बंद पाडल्याशिवाय राजीनामा होणार नाही. “हे होऊ शकतं, पण फक्त विद्यार्थीच पुणे बंद पाडतील असं होणार नाही. पुणेकरांना कळालेलं आहे की, अधिकारी पैसे देऊन अधिकारी होणार असतील तर त्याचा फटका जनतेला सुद्धा बसू शकतो. त्या अनुषंगाने जर या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुणे बंद पडू शकतं. पण त्यात लोकांची सुद्धा साथ असेल”