एमपीएससीच्या विद्यार्थ्यांवर दाखल झालेल्या एफआयआरमध्ये काय? रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांवरील गुन्हेगारी कारवाईविरोधात रोहित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पुणे आंदोलनातील विद्यार्थ्यांवर एफआयआरमध्ये गंभीर कलमं लादली असून, त्यात दगडफेक आणि रॉकेटचा उल्लेख आहे. एफआयआरमध्ये अनेक चुका, जसे की नावांमधील गोंधळ आणि अनुपस्थित विद्यार्थ्यांची नावे, उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

प्रदीप कापसे , रिपोर्टर : एमपीएससीच्या परीक्षेत झालेल्या घोळा विरोधात विद्यार्थ्यंनी पुण्यात आंदोलन सुरू केलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. आंदोलनातील काही विद्यार्थ्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांवर एफआयआरमधून गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याबाबतचा मोठा गौप्यस्फोट रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच एफआयआर दाखल केल्याबद्दल आंदोलक विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे.
रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना हा आरोप केला. विद्यार्थ्यावर FiR दाखल झाला आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या हातात दगड होते, रॉकेट होते असे कलम टाकण्यात आले आहेत. आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. जामीनपात्र गुन्हा आहे, असं रोहित पवार म्हणाले. यावेळी रोहित पवार यांच्या आजी आणि काकू सुमतीही आंदोलनाच्या ठिकाणी आल्या होत्या.
या एफआयआरमधील चुकाही रोहित पवार यांनी निदर्शनास आणून दिल्या. एफआयआरमध्ये रोहित महिला आणि प्रियांका पुरुष लिहिलं आहे. ज्या पीएसआयने हा एफआयआर लिहिला तो कदाचित पेपर फोडून पास झाला असेल. जे आंदोलनात नव्हते त्यांच नाव FIR मध्ये टाकलं आहे. महिलांना पुरुष आणि पुरुषांना महिला करण्याचा प्रताप करण्यात आला आहे, असा हल्ला रोहित पवार यांनी चढवला.
तो प्रश्न का नाही सुटला?
अलका चौकात बसलेल्या लोकांची नाव का नाहीत? त्यांच्या मागण्या असू शकतील. सत्ताधारी तिथे आले होते. त्यांनी पाठिंबा दिला. तरी सुद्धा त्यांच काम होत नाही. ते आंदोलन सुरूच राहतं तर सत्ताधारी काय करतात? तो प्रश्न सुटायला हवा होता, का नाही सुटला मग? असा सवाल त्यांनी केला.
जे नव्हते…
1 तारखेला ऋषी तिथे नव्हते. ते दुसऱ्या दिवशी इथे आले. सोमनाथ चव्हाण होता का नव्हता? तो गावाला गेला होता. गजानन शेळके बाहेरून आला होता. इथे उपोषणाला बसला. संकेत कणसे तिथे होता का नव्हता? असा प्रश्नही त्यांनी केला.
आज नाही तर उद्या विषय संपणार आहे. ते आज किवा उद्या कोणाला तरी पाठवतील त्याचं सगळं क्रेडिट उपोषणकर्त्यांना जातं. माझं नाव एफआयआरमध्ये असतं तर मी फ्रेम करून ठेवलं असतं. हा FIR विद्यार्थ्यांसाठी झाला याचा मला अभिमान असला असता. माझ्यावर अन्याय करू नका. माझं पण नाव त्यामध्ये घ्या. जास्तीत जास्त पासपोर्टला अडचण येईल, असा टोला त्यांनी हाणला.
