AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ST संप मोडून काढण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय? काय झाला फैसला ?

एसटी महामंडळ कामगारांच्या संपाचा फटका गणपती विशेष बसेसना होण्याची शक्यता आहे. आज पासून कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात गणपती विशेष गाड्यांची वाहतूक सुरु होत आहे.

ST संप मोडून काढण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय? काय झाला फैसला ?
| Updated on: Sep 04, 2024 | 12:55 PM
Share

एसटी कामगारांचा संप मोडून काढण्यासाठी महामंडळ कंत्राटी चालकांची भरती करणार एसटी कामगारांच्या अकरा संघटनांच्या कृती समितीने 3 सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. ऐन गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर एसटीचे कामगार संपावर गेल्याने गणपती जादा वाहतूक अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यातील 251 पैकी 63 आगार पुर्णतः बंद होते. 73 आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू होती. तर 115 आगारामध्ये वाहतूक सुरळीत सुरू होती. दरम्यान, दुपारी संपाची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

आज बुधवारी दुपारी 12 पर्यंत एसटीच्या राज्यभरातील 251 आगारापैकी 96 आगार पूर्णतः बंद आहेत. 82 आगार अंशतः सुरू आहेत. तर 73 आगारातील वाहतूक सुरळीत सुरू आहे. तरी गणपतीच्या सणाला जर आरक्षित प्रवाशांना जर बसेस उपलब्ध नाही झाल्या किंवा बस चालकांअभावी सुटल्या नाहीत तर एसटीच्या विश्वासार्हतेला तडा जाऊ शकतो. त्यामुळे एसटी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

एसटीच्या कंत्राटी चालकांच्या भरतीची जाहीरात येथे पाहा –

msrtc contract drivers

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्य कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि वेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी काम बंद आंदोलन पुकारले आहे. काल पासून एसटीच्या अनेक आगारातून कामगारांना काम बंद ठेवले आहे.एसटी महामंडळाच्या अकरा कामगार संघटनाच्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनामुळे काल 3 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 251 आगारापैकी 35 आगार पुर्णतः बंद झाले होते. बाकीचे आगार अंशतः अथवा पुर्णतः सुरू असल्याचे म्हामंडळाने स्पष्ट केले होते. एसटीच्या 11 कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळाने गणपती सणाच्या जादा वाहतूकीला अडचण येऊ नये यासाठी करार पद्धतीने कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठवाडा आणि खान्देशात मोठा फटका

एसटी संपाचा जादा प्रभाव मराठवाड्यात ( 26 आगार पुर्णतः बंद ) आणि खान्देशात (32 आगार पुर्णतः बंद) पसरला आहे. मुंबई-पुणे मार्गावरील ई- शिवनेरी बस सेवा सुरळीत सुरू आहे.तरीही संपाबाबत तोडगा न निघाल्यास एसटीची गणपती वाहूतक अडचणीत येण्याची शक्यता आहे. आज बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत राज्यभरातील एसटीच्या 251 पैकी 63 आगार पुर्णतः बंद होते. 73 आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू होती. तर 115 आगारामध्ये पुर्णतः वाहतूक सुरळीत सुरू होती.

आज बैठक होणार

एसटी प्रशासन वारंवार संपकरी कर्मचार्‍यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे.  प्रवाशांची सणासुदीमध्ये गैरसोय करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. सर्वाधिक गैरसोय आज जाणाऱ्या गणेश भक्तांची होऊ शकते. सुमारे एक हजार एसटी बसेस मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून आज रवाना होत आहेत. दुर्दैवाने संपामुळे बाहेरच्या विभागातून तितक्या बसेस उपलब्ध न झाल्यास चाकरमान्यांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे आज दुपारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती कामगार कृती समितीची बैठक होत आहे.

गणपतीच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता

येत्या सात सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी पहिली पसंती एसटीला दिली आहे. त्यामुळे4200 ग्रुप आरक्षणासह एकूण 4953 जादा बसेस आतापर्यंत फुल्ल झाल्या आहेत. मुंबईतून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने यंदा 3 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान 5000 जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के, ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना 50 टक्के तिकिट दरात सवलत आहे. तीन सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.