AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत एसटीच्या 500 हून अधिक बसेस सरकारी प्रचाराला, चाकरमान्यांचे हाल

महिला मेळाव्यासाठी राज्य सरकारने एसटीकडून पाचशेहून अधिक बसेसची मागणी एसटी महामंडळाकडून केली आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली येथील प्रवाशांना सोमवारी एसटी बसेस विना राहावे लागणार आहे.

ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत एसटीच्या 500 हून अधिक बसेस सरकारी प्रचाराला, चाकरमान्यांचे हाल
MSRTC BUS 1
| Updated on: Sep 01, 2024 | 3:21 PM
Share

सरकारी उपक्रम असलेल्या एसटी महामंडळाला सरकार अर्थपुरवठा करून उभारी देत आहे. परंतू एसटी महामंडळाचे मुख्य काम प्रवासी सेवा करण्याचे असताना आता सरकारी प्रचार यंत्रणेसाठी तिला दावणीला बांधण्याची नवी प्रथा रुढ झाली आहे. जळगावातील ‘लाडली दीदी’ उपक्रमानंतर उद्या सोमवारी 2 सप्टेंबर रोजी कोल्हापुराच्या वारणानगरात राष्ट्रपतीच्या उपस्थितीत होणाऱ्या महिला मेळाव्याला तब्बल अडीचशे ते पाचशेहून अधिक बसेसची मागणी सरकारने एसटी महामंडळाला केली आहे. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या गाड्या अपुऱ्या पडणार असल्याचे म्हटले जात आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कोल्हापूरच्या वारणानगर‌ येथे होणाऱ्या उद्याच्या महिलांच्या मेळाव्यासाठी एसटी महामंडळाकडे तब्बल 228 बसेसची मागणी सरकारने केलेली आहे. या बसेस 44 आसनी आणि मोठ्या आकाराच्या असून या बसेस महिला मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी पुरविण्यात येणार आहेत.  उद्याच्या  02 सप्टेंबरच्या माननीय राष्ट्रपतींच्या वारणा नगरातील शिवनेरी क्रीडागण येथे होणाऱ्या कार्यक्रमास सुमारे 50 हजार महिला उपस्थित रहाणार आहेत. यामुळे कोल्हापूर आणि सांगली आगारात प्रवाशांना गैरसोय होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर, सांगली येथील प्रवाशांना सोमवारी एसटी बसेस विना राहावे लागणार आहे. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांसह अनेकांचा आठवड्याच्या पहिला दिवस खाजगी वाहतूकीवर विसंबावे लागणार आहे. आगारांनी स्वतःच्या ताफ्यातील बसेस वारणानगर आणि परिसरात पाठवायच्या आहेत. तसेच इचलकरंजी आणि मलकापूर आगारांच्या मदतीसाठी सांगली विभागाच्या 50 बसेस मागविल्या आहेत. त्यामुळे कोकणातील गणपती सणासाठीचे नियोजन बिघडणार आहे. कोकणात गाड्याची गणेशोत्सवासाठी मोठी मागणी असल्याचे एसटी कर्मचारी कॉंग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे.

येथे पाहा सरकारने एसटीकडे मागविलेल्या बसेसचा आगारनिहाय तक्ता

अ. क्र.आगार           एकूण
कोल्हापूरसंभाजीनगर इचलकरंजीमलकापूरकुरुंदवाडकागलगगनबावडाशिराळाइस्लामपूरसांगली मिरज
तालुका
पन्हाळा3535
करवीर - 01330223563
शाहुवाडी7259950
हातकणंगले23161655
करवीर - 022525
3830322523255991616228

आपल्या आगाराच्या बसेस दि.2 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी ठरलेल्या वेळेत कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचतील याची दक्षता घेण्यात यावी असेही या परिपत्रकात म्हटले आहे. आगार व्यवस्थापक राज्य परिवहन इचलकरंजी यांनी सांगली आणि मिरज आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधून बसेस नियोजित ठिकाणी पोहचल्याची खात्री करावी असेही पत्रकात नमूद केले आहे, मलकापूर आगार व्यवस्थापकांनी इस्लामपूर आणि शिराळा आगार व्यवस्थापकांशी संपर्क करुन या बसेस नियोजित ठिकाणी पोहचल्याची खातरजमा करावी असे पत्रकात म्हटले आहे.

सरकारच्या परिपत्रकात एसटी महामंडळाच्या आगारांना दिलेल्या सूचना्

  • कार्यक्रमासाठी वापरण्यात येणा-या बसेस 44 आसन क्षमतेच्या असाव्यात.
  • बसेस स्वच्छ आणि सुस्थितीतीलच बसेस पाठविण्यात, कोणतीही बस वाटेत बिघडणार नाही याची खास दक्षता घेण्यात यावी.
  • या बसेस सोबत दोन लॉगशीट देण्यात यावीत.
  • आगार कार्यकक्षेतून सुटणा-या बसेस कार्यक्रमाच्या पार्कींग ठिकाणीच बसेस पार्कींग करण्याच्या सुचना संबंधीत चालकांना देण्यात याव्यात असेही या परिपत्रकात नमूद केले आहे.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.