AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसटीचा इकोफ्रेंडली ‘LNG’ बसेस बांधणीचा ठराव मंजूर, महामंडळाची सरकारकडे ९७० कोटींची मागणी

एसटी महामंडळाने आपल्याकडील जुन्या डिझेल बसेसच्या चासिसवरच नवीन एलएनजीच्या बसेसचा ढाचा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एसटी संघटनेचे नेते कॉंग्रेस श्रीरंग बरगे यांनी टिका केली आहे. जुन्या ऐवजी नवीन बसेस घेणे सोयीस्कर ठरले असते असेही त्यांनी म्हटले आहे.

एसटीचा इकोफ्रेंडली 'LNG' बसेस बांधणीचा ठराव मंजूर, महामंडळाची सरकारकडे ९७० कोटींची मागणी
msrtc LNG buses news
| Updated on: Aug 27, 2024 | 12:55 PM
Share

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील ५००० डिझेल बसेसचे रूपांतर ‘एल‌एनजी’ बसेसमध्ये टप्प्याटप्प्याने होणार आहे.  द्रवरुप नैसर्गिक वायू इंधनावर धावणाऱ्या या बसेस एसटीच्या जुन्या बसेसच्या चासिसवरच बांधण्यात येणार आहेत. या बसेसच्या बांधणीसाठी प्रत्येक बस मागे १९.४० लाख रुपये खर्च येणार आहे. या संदर्भातील निर्णयाला एसटी महामंडळाने अखेर मंजुरी दिली आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे निधी देण्याची विनंती देखील करण्यात आली आहे.

२०२३-२०२४ सालच्या अर्थसंकल्पीय भाषणात उप मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी हरित परिवहनाला चालना देण्यासाठी ५ हजार डिझेल बसेसचे द्रवरुप नैसर्गिक वायू इंधनावरील वाहनांमध्ये रुपांतर करण्याचे जाहिर केले होते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दि.२२ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या ३०३ व्या बैठकीत महामंडळाच्या एकूण ५००० डिझेल इंधनावर चालणाऱ्या वाहनांचे लिक्विफाईड नॅचरल गॅस ( LNG ) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये रुपांतरण करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. यानूसार प्रति बस रु.१९.४० लाख प्रमाणे ५००० वाहनांसाठी एकूण रु.९७० कोटी निधी महाराष्ट्र शासनाकडून मागण्यासाठी संचालक मंडळाने मंजूरी दिली आहे.

 महामंडळास  निधीची आवश्यकता

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बसस्थानकांच्या आधुनिकीकरणांतर्गत बांधकाम आणि इतर सोयी सुविधेसाठी भांडवली मालमत्तेच्या निर्मितीकरीता अनुदान या लेखाशीर्षाखाली त्या-त्या आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या तरतूदीमधून खर्च करण्यात येणार आहेत. यासाठी सन २०२४ – २०२५ मध्ये रु.४० कोटी, सन २०२५ – २०२६, मध्ये रु.२०० कोटी, सन २०२६ – २०२७ मध्ये रु.३७० कोटी आणि सन २०२७ – २०२८ मध्ये रु.३६० कोटी असा एकूण रु.९७०.०० कोटी रुपयांच्या निधीचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.