AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, बसस्थानक आणि आगराचा PPP तून होणार पुनर्विकास

एसटी महामंडळाच्या बसस्थानकांचा खाजगी माध्यमातून पुनर्विकास करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळणार आहेत.

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, बसस्थानक आणि आगराचा PPP तून होणार पुनर्विकास
| Updated on: Oct 09, 2024 | 1:36 PM
Share

एसटी महामंडळाने आपल्या बसस्थानक आणि आगारांचा खाजगी माध्यमातून पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता एसटी बसस्थानके आणि आगार विमानतळासारखी चकाचक आणि हायफाय होणार आहेत. या संदर्भात एसटी महामंडळाने PPP अर्थात पब्लिक आणि प्रायव्हेट पार्टनरशिपमधून बस स्थानक आणि आगारांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. या एसटी महामंडळाने निविदा मागविल्या आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या आगार आणि बसस्थानकांत प्रवाशांना विविध सुविधा देण्यात येणार आहेत.

एसटी महामंडळाचा तोट्यात असल्याने एसटी प्रवासी उत्पन्न वाढविण्याबरोबरच अन्य मार्गातून देखील उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी एसटी महामंडळाचे राज्यभरात तब्बल 252 आगार आहेत. या आगार आणि बस स्थानकांतील जागांचा PPP अर्थात पब्लिक आणि प्रायव्हेट पार्टनरशिपमधून पुनर्विकास केला जाणार आहे. यात एसटीच्या जागा खाजगी कंपन्यांना भाडेतत्वावर देऊन एसटीला उत्पन्न मिळावे असा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना एसटी स्थानक आणि आगारात विमानतळासारखे हायफाय वातावरण आणि शॉपिंग देखील करता येणार आहे.पहिल्या टप्प्यात राज्यातील 19 बसस्थानके आणि आगारांचा पुनर्विकास करण्यासाठी टेंडर काढण्यात आले आहे.

या बसस्थानकांचा होणार कायापालट

महाराष्ट्रातील ग्रामीण जनता अद्यापही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर म्हणजेच एसटीवर अवलंबून आहेत. एसटीला ग्रामीण भागात पर्याय नाही. एसटीची बस राज्याच्या अगदी दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांपासून ते थेट नगरे-महानगरांपर्यंत जोडलेली आहे. आता एसटीत लवकरच अशोक लेलॅंडच्या साध्या डीझेलवरील दोन हजार गाड्या दाखल होणार आहेत. त्यातच आता 19 बसस्थानक आणि आगारांचा पुनर्विकास होणार असल्याने एसटी प्रवाशांना पुन्हा चांगले दिवस येतील असे म्हटले जात आहे. पुण्यातील लोणावळा बसस्थानक, कोल्हापूरातील ताराबाई पार्क ( जुनी विभागीय कार्यशाळा ) आणि पन्हाळा ( खुली जागा ), जळगाव येथील शहर बसस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक, विभागीय कार्यशाळा आणि मुक्ताई नगर आगार, नगर येथील पारनेर बसस्थानक, लातूर ( शिवाजी चौक ), बीडचे बसस्थानक, निवासी सदनिका आणि माजलगाव बसस्थानक, नांदेडचे हदगाव बसस्थानक, धाराशीव बसस्थानक आणि कळंब बसस्थानक, अकोलाचे रिसोड बसस्थानक आणि वाशिम बसस्थानक, अमरावतीचे चांदूरबाजार बसस्थानक,यवतमाळचे पुसद बसस्थानक, भंडाराचे बसस्थानक, नागपूरचे हिंगणा बसस्थानक,ठाण्याचे वाडा आगार यांचा पीपीपी माध्यमातून पुनर्विकास होणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.