AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसटीस 3191 कोटी रूपयांचा तोटा होणार ?, काय म्हणाले मंत्री प्रताप सरनाईक?

या बसेसचा उर्वरित पुरवठा आता सुधारित करारानुसार होण्यासाठी कंपनीने नियोजन करावे आणि बस पुरवठादार कंपनीने सुधारित वेळापत्रकानुसार बस पुरवठा करावा असेही मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी म्हटले आहे.

एसटीस 3191 कोटी रूपयांचा तोटा होणार ?, काय म्हणाले मंत्री प्रताप सरनाईक?
file photo
| Updated on: May 30, 2025 | 6:00 PM
Share

एसटी महामंडळाने अलिकडे 5150 ई- बसेस भाडेतत्त्वावर मिळण्याबाबत करार केला होता. या बसेस आता नव्या वेळापत्रकानुसार महामंडळाला या मिळतील असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सांगितले. मंत्रालयात कंपनी प्रतिनिधींसोबत शुक्रवारी आयोजित केलेल्या बैठकीत मंत्री सरनाईक ई-बसेसच्या पुरवठ्याबाबत आढावा घेतला. या बैठकीस अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आणि कंपनीचे के.व्ही. प्रदीप आदी उपस्थित होते.

या कंपनीने दिलेल्या बसेसचा चालनीय तोटा लक्षात घेता, राज्य सरकारकडून निधी मिळण्यासाठी व्यवहार्यता अंतर अर्थपुरवठ्यासाठी (viability gap funding) चा प्रस्ताव पाठविण्यात यावा. या ईलेक्ट्रीक कंपनीने आतापर्यंत 220 बसेसचा पुरवठा केला आहे. उर्वरित पुरवठा सुधारित करारानुसार करण्यासाठी कंपनीने नियोजन करावे आणि बस पुरवठादार कंपनीने दिलेल्या वेळापत्रकानुसार बस पुरवठा करणे अपेक्षित असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

इवे ट्रान्स प्रा.लि. कंपनीने भाडेतत्वावर 5150 ईलेक्ट्रीक बसेस भाडेतत्वावर कंपनीने पुरवठा करण्याचा करार करण्यात आला होता. त्यापैकी 220 बसेसचा पुरवठा प्रत्यक्षात झाला आहे. यामध्ये 12 मीटर आणि 9 मीटर लांबीच्या बसेस आहेत. महामंडळाने विभागनिहाय नवीन खाते तयार करून इलेक्ट्रीक बसच्या उत्पन्नामधून कंपनीला बिलांची रक्कम देण्यात येत आहे. त्यानुसार 60 कोटी रूपये कंपनीला दिले आहेत. उर्वरित 40 कोटी रक्कम देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे सरनाईक यांनी या बैठकीत सांगितले.

3191 कोटी रूपयांचा तोटा?

एसटी  महामंडळाला 12 मीटर बस चालविण्याचे प्रति किलोमीटर 12 रूपये आणि 9 मीटर बस चालविण्याचे 16 रूपये प्रति किलोमीटर तोटा ग्राह्य धरून पुढील काही वर्षात 3191 कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. या तोट्याची रक्कम राज्य सरकारकडून देण्याचे मान्य केल्यास बस पुरवठ्याचा हा करार पूर्णत्वास जाऊ शकतो. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेवून निर्णय घेण्यात येईल अशीही माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेकडे वाटचाल? दादांबरोबर युती पहिली पायरी?
पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेकडे वाटचाल? दादांबरोबर युती पहिली पायरी?.
आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?
आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?.
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा.
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध.
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!.
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ...
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ....
नाशिक भाजपात इनकमिंगवरून राडा, भाजपन देवयानी फरांदे यांचा विरोध डावलला
नाशिक भाजपात इनकमिंगवरून राडा, भाजपन देवयानी फरांदे यांचा विरोध डावलला.
पुण्यातही मविआत फूट, NCP च्या एकत्रीकरणाला ठाकरेंनंतर काँग्रेसचा विरोध
पुण्यातही मविआत फूट, NCP च्या एकत्रीकरणाला ठाकरेंनंतर काँग्रेसचा विरोध.
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा शिंदे सेनेला रामराम
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा शिंदे सेनेला रामराम.
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.