Ladki Bahin Yojana : या तारखेपूर्वी महिलांच्या खात्यात जमा होणार 1500 रुपये, मोठी अपडेट..

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठे अपडेट आहे. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. पैसे नक्की कधी जमा होणार याबाबत अपडेट आली.

Ladki Bahin Yojana : या तारखेपूर्वी महिलांच्या खात्यात जमा होणार 1500 रुपये, मोठी अपडेट..
mukhyamantri ladki bahin yojana
| Updated on: Aug 10, 2026 | 1:23 PM

Ladki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. हे पैसे महिलांच्या बँक खात्यात ट्रान्सफर होतात.  ई-केवायसी न केल्याने अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाली नाहीत. यासोबतच महिला व बालकल्याण विभागाकडून महिलांच्या अर्जाची छाननी केली जातंय. ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत, त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. आयकर विभागाच्या मदतीने अर्जांची छाननी केली जातंय. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून काही नियम आणि अटी ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, त्यावेळी महिलांनी सरसकट अर्ज केली आणि ती अर्ज पात्रही ठरवण्यात आली. आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा 1500 रूपयांचा पहिला हप्ता येण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नुकताच खात्रीलायक सूत्रांकडून मोठी माहिती मिळाली. त्यानुसार, 15 ऑगस्टपूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात जुलै महिन्याचे पैसे येण्याची दाट शक्यता आहे. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडक्या बहि‍णींच्या निधीचे थेट हस्तांतरण करण्याचा अंतिम निर्णय होऊ शकतो.

यापूर्वीच जून महिन्याचा हप्ता 15 जुलै रोजी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आला. 10 तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होईल, असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार निधी वर्ग केला जातोय. जर 18 ऑगस्टपर्यंत हा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला नाही तर मग थेट रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून महिलांच्या खात्यात थेट 3000 हजार जमा होऊ शकतात.

लाडकी बहीण योजना अधिक पारदर्शक करण्यासाठी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला. इ केवायसी लागू करण्यात आली. 80 लाख महिला यानंतर या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत. 80 लाख महिलांच्या कागदपत्रात त्रुटी निघाल्याने या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या नाहीत. त्यामध्येच आता जुलै महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us