AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana 1st Installment : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता ‘या’ तारखेला येणार, तमाम महिलांसाठी खुशखबर

Ladki Bahin Yojana 1st Installment Date News in Marathi : राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या आधीच भेट दिली जाणार आहे.

Ladki Bahin Yojana 1st Installment : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता ‘या’ तारखेला येणार, तमाम महिलांसाठी खुशखबर
लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता ‘या’ तारखेला येणार
| Updated on: Aug 07, 2024 | 6:22 PM
Share

महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आंनदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत महिलांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. राज्यभरात आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज देखील केला आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे सरकार या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी पाठवणार असल्याची माहिती समोर आली होती. पण आता महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की, सरकार त्याआधीच महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा करणार आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधीच पहिला हप्ता दिला जाणार आहे. याचाच अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपल्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट हे 19 ऑगस्टच्या आधीच मिळणार आहे. येत्या 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. पण त्याआधीच 17 तारखेला सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात योजनेचा पहिला हप्ता पाठवण्याचा निर्णय आजच्या मैत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

एकाच क्लिकवर सर्व महिलांच्या बँक खात्यात पैसे येणार

आगामी विधानसभा निवडणुकीच्याआधी राज्य सरकारकडून जाहीर झालेली लाडकी बहीण योजना ही सर्वात महत्त्वकांक्षी योजनांपैकी एक योजना आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 17 ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार आहे. या दिवशी सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाच दिवशी आणि एकाच वेळी 3000 रुपये जमा होणार आहेत. या दिवशी लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचे एकत्र पैसे मिळणार आहेत. विशेष म्हणजे महिलांना आता या योजनेच्या पैशांसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. सरकारकडून 17 ऑगस्टला पैसे वाटपासाठी कार्यक्रम पार पडेल. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री कदाचित एकदाच क्लिक करतील आणि सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाचवेळी योजनेचे पैसे जमा होतील.

राज्य सरकार 17 ऑगस्टला भव्य दिव्य असा मोठा कार्यक्रम घेणार आहे. या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. तर प्रत्येक जिल्ह्यांचे पालकमंत्री या कार्यक्रमा उपस्थित राहणार आहेत. 17 ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचा विचार करणार आहे. आतापर्यंत १ कोटी ६० लाख महिलांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलाय. त्यापैकी १ कोटी २७ लाख अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.