AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेता बनला चोर! महिलेच्या गळ्यातली चेन ओढली अन्…मुंबईत मोठं होण्याच्या नादात हिरोचे नको ते पराक्रम; पोलिसांनी बेड्या ठोकल्या

Bhojpuri Actor : मुंबई पोलिसांनी एका भोजपुरी अभिनेत्याला अटक केली. एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन खेचून चोरी केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. गरीबीमुळे त्याने हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.

अभिनेता बनला चोर! महिलेच्या गळ्यातली चेन ओढली अन्...मुंबईत मोठं होण्याच्या नादात हिरोचे नको ते पराक्रम; पोलिसांनी बेड्या ठोकल्या
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Sep 22, 2026 | 8:33 PM
Share

मुंबई.. स्वप्नांची नगरी.. देशभरातून कित्येक लोकं आपली स्वप्न करण्यासाठी या शहरात येतात, काहींना मनाजोगं काम मिळतं, झटून प्रयत्न करतात आणि त्यांची स्वप्न पूर्ण करून यशस्वी होतात. पण काहींचं नशीब इतकं चागलं नसतं. काम , पैसा, यश मिळवण्याच्या ओढीने मुंबईत आलेले सगळेच यशस्वी ठरतात असं नाही. आणि मग पैसे कमावण्यासाठी ते नको ते पाऊल उचलताता, चुकीच्या मार्गाला लागतात. असाच एक प्रकार णुंबईत उघडकीस आला आहे. मुंबईत आलेल्या एका छोट्या भोजपुरी अभिनेत्याला चोरीच्या आरोपाखाली पकडण्यात आल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने सोमवारी दिली.

आर्थिक तंगीमुळे त्याने सांताक्रूझ भागातील एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरल्याचा आरोप त्याच्यावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आशीष अत्तरचंद शर्मा असं आरोपीचं नाव असून तो सांताक्रूझ (पूर्वचा) रहिवासी आहे.  चोरी केलेली सोन्याची चेन पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केली आहे.

नेमकं काय घडलं ?

वाकोला पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला घरात असताना एक अनोळखी व्यक्ती घरात शिरला आणि त्याने तिच्या गळ्यातील चेन खेचली आणि तो फरार झाला. यानंतर पीडित महिलेच्या मुलाने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. मात्र ही घटना गर्दीने भरलेल्या चाळीत घडली, तसेच त्यावेळी तिथे कोणताही दुसरा साक्षीदार नव्हता, तसेच त्या भागात सीसीटीव्हीही नसल्याने आरोपीचा शोध घेणं पोलिसांना बरंच कठीण गेलं.

अशी पटवली ओळख

मात्र तक्रारदार व्यक्तीने आरोपीच्या चेहऱ्याचं जे वर्णन केलं त्या आधारे तपास पथकाने आसपासच्या गल्लीतील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. चोरीची ही घटना जेव्हा घडली, तेव्हा त्या परिसराच्या जवळ एक संशयित व्यक्ती वेषांतर करून संशयास्पदरीत्या फिरताना सीसीटीव्हीत दिसून आली होती, असं सब-इनस्पेक्टर सुशांत कुमार पाटील यांनी सांगितलं.

खबऱ्यांच्या मदतीने आरोपीला शोधण्यात मिळालं यश

संशयित आरोपीचा फोटो मिळाल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी स्थानिक गुप्त खबऱ्यांपर्यंत त्या इसमाचा फोटो पोहचवला. त्यानंतर खबऱ्यांकडून जी अचूक माहिती मिळाली, त्या आधारे पोलिसांच्या एका पथकाने शाम सुंदर चाळीत छापा मारला आणि आरोपी शर्मा याला बेड्या ठोकल्या. पोलिस स्थानकात आणून त्याची चौकशी केल्यावर आरोपीने गुन्हा कबूल केला. मात्र त्यामागचं जे कारण त्याने सांगितलं त्याने पोलिसही हैराण झाले. आर्थिक तंगी मुळेच मी हे चोरीचं पाऊल उचललं असं त्याने पोलिसांसमोर सांगितलं. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

काम न मिळाल्याने अभिनेता बनला चोर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशीष शर्माने काही भोजपुरी चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका केल्यात. गेल्या काही काळापासून तो कामाच्या शोधात होता. मात्र काम न मिळाल्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती बिघडली, पैशांची कमतरता भासू लागली. अखेर आर्थिक परिस्थितीला कंटाळूनच त्याने चोरी आणि लुटमारीसारखे गुन्हे करण्यास सुरूवात केली अशी माहिती समोर आली आहे.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?