AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत उड्डाणपुलावर रातोरात लागले गुजराती फलक, जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरू; शिवसेना आक्रमक

मुंबईत गुजराती भाषेत पाट्या लागल्याने मराठी जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. परळमध्ये अशा सूचना फलकांवरून शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. मराठी अस्मितेला धक्का पोहोचवणारा व मुंबईत गुजराती प्राबल्य वाढवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला. कंत्राटदाराला जाब विचारण्यात आला असून, पालिका अधिकाऱ्यांच्या जबाबदारीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुंबईत उड्डाणपुलावर रातोरात लागले गुजराती फलक, जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरू; शिवसेना आक्रमक
मुंबईत गुजराती भाषेत फलक
| Updated on: Mar 27, 2026 | 10:31 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरूच आहे. मुंबईसह अनेक भागात अचानक गुजराती भाषेत पाट्या लागताना दिसत आहेत. त्यामुळे मराठी माणसामध्ये तीव्र संताप उमटत आहे. आता मुंबईतील परळ येथेही रातोरात गुजराती भाषेत सूचना फलक लागले. त्यामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. मराठी माणसाला डिवचण्याचा हा प्रकार असून हळूहळू मुंबईत गुजरातीचं प्राबल्य वाढवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. तसेच हे फलक मुंबईत कुठेच लागता कामा नये. पुन्हा असा प्रकार घडला तर आंदोलन करण्याचा इशाराही शिवसैनिकांनी दिला आहे.

परळ टीटी उड्डाण पुलाची एक मार्गिका बंद करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये आणि चालकांनी आपली वाहनं दुसऱ्या बाजूने चालवावी यासाठी कंत्राटदाराने या ठिकाणी सूचना फलक लावले होते. विशेष म्हणजे ही सूचना इंग्रजी आणि गुजरातीत लिहिली होती. महाराष्ट्रात मराठी लिहिण्याऐवजी चक्क गुजराती आणि इंग्रजीत सूचना लिहिल्याने शिवसैनिक चांगलेच संतापले. शिवसैनिकांनी याप्रकरणी कंत्राटदाराला जाब विचारला. त्यामुळे कंत्राटदाराची बोबडीच वळली होती.

मुंबईत गुजराती फलक लावताच कसे ?

शिवसेनेचे स्थानिक शाखाप्रमुख मिनार नाटळकर यांनी याबाबतची माहिती दिली. परेल टीटी उड्डाणपुलाची एक लेन बंद करून काम सुरू आहे. याठिकाणी गुजरातीत सूचना फलक लावण्यात आला होता. काल मी तो काढायला सांगितला. परंतु मुंबईत गुजराती फलक लागतातच कसे काय? हा आमचा सवाल आहे. हे काय गुजरात आहे का? या राज्याची भाषा कोणती आहे हे कंत्राटदाराला माहीत नाही का? असा संतप्त सवाल मिनार नाटळकर यांनी केला.

पालिका अधिकारीही जबाबदार

मुंबई महापालिका उड्डाणपुलाचं काम करत आहे. महापालिकेतच हा कारभार असेल तर कुणाकडे दाद मागायची? या प्रकाराला एकटा कंत्राटदार जबाबदार नाही. तर मुंबई महापालिकेचे अधिकारीही त्याला तेवढेच जबाबदार आहेत. कोणत्या भाषेत फलक लावले गेलेत हे पाहण्याची जबाबदारी कुणाची आहे? असा सवाल करतानाच संबंधित कंत्राटदार गुजराती आहे की नाही माहीत नाही, पण त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी नाटळकर यांनी केली.

Follow Us
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'