AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai local train : विवस्त्रच फिरायचं असेल तर… लोकल ट्रेनमधील महिलेचा Video व्हायरल

Mumbai local train : मुंबईतील लोकल ट्रेनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक महिला, बुरखा घातलेली तरूणी आणि तिच्या मैत्रिणींना सुनावताना दिसत आहे. या घटनेमुळे स्वातंत्र्य, ओळख आणि धार्मिक अभिव्यक्ती यासारख्या विषयांवर ऑनलाइन जोरदार वादविवाद सुरू झाला आहे.

Mumbai local train : विवस्त्रच फिरायचं असेल तर...  लोकल ट्रेनमधील महिलेचा Video व्हायरल
| Updated on: Aug 29, 2025 | 2:01 PM
Share

सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओज, फोटो वेगाने व्हायरल होत असतात. कधी कधी ते मजेशीर, हसवणारे असतात, तर कधीही ते पाहून आपणच आश्चर्यचकित होत असतो. मुंबईची लाईफलाइन असलेल्या लोकलचेही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर येत असतात. कधी त्यात गर्दी, कधी भांडणं किंवा कधी काही युनिक कंटेंटही दिसतो. सध्या मुंबईतल्या लोकलचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामुळे मात्र नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. लोकलमधून प्रवास करताना एक तरूणीने घातलेले कपडे, तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणी यालवरून एका महिलेला एवढा राग आला की ती त्या मुलीला अद्वातद्वा बोलू लागल.

संतापाच्या भरात आपण काय बोलतोय याच तिला भानंही नव्हतं, पण तिच्या या आक्रस्ताळेपणामुळे रेल्वेच्या डब्यातील इतर लोकं मात्र कानकोंडे झाले होते. आणि ती ज्या मुलीला व तिच्या मैत्रिणींना उद्देशून बोलत होती, त्यांना तर काय बोलावं समजतच नव्हतं. रागारागात बोलताना एका क्षणी ती महिला असं काही बोलली की सगळेच अवाक झाले.

सोशल मीडिया साईट X वर (पूर्वीच ट्विटर) @TheTreeni नावाच्या एका यूजरने 26 ऑगस्ट 2025 रोजी लोकलच्या डब्यातला एक व्हिडीओ शेअर केला. बुरखा घातलेली एक तरूणी आणि तिच्या शेजारी बसलेल्या तिच्या मैत्रिणी पाहून एका महिलेचं डोकं सटकलं आणि तिने त्यांना उभं-आडवं झापलं. ती (बुरखा घातलेली) मुलगी हिंदू मुलींसोबत प्रवास करत असल्यामुळे त्या महिलेने तिला खूपच सुनावलं. मात्र तिची भाषा, आवेश आणि रागावण कोणालाच पसंत पडलं नसल्याचं या व्हिडीओतून दिसत आहे.

नागडंच फिरायचं असेल तर …

ती महिला त्या तरूणीवर “समाजाला लाज आणत असल्याचा” आरोप मोठ्याने करत होती. व्हिडीओमध्ये ती म्हणते : ” या मुस्लिम मुलीकडे बघा जरा, ती आमच्य समुदायाला लाज आणत्ये… जर तुला नग्न फिरायचं असेल तर बुरखा न घालता फिर ना ! आमचा बुरखा बदनाम होतोय” अशा शब्दांत त्या महिलेने तिला वाट्टेल ते सुनावलं.

मात्र त्या महिलेचं वागणं, तिचा आरडाओरडा, तिचं बोलणं ऐकून ट्रेनमधले बाकीचे प्रवासी खूपच अस्वस्थ दिसत होते. काहींनी चिंतेने एकमेकांकडे पाहिं तर काहीजण चूपचाप बसून ऐकून न ऐकल्यासारखं करत होते. आणि ज्या (बुरखा घातलेल्या) तरूणीवर ही सगळी टीका केली जात होती, ती तर मान खालून शांत बसली होती.

मुंबईची लाईफलाईन म्हटल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये पुरुष आणि महिलांमधील मारामारीचे व्हिडिओ दररोज व्हायरल होत असतात. पण या व्हिडिओमुळे वैयक्तिक स्वातंत्र्य, ओळख आणि सांस्कृतिक संवेदनशीलतेबद्दल वादविवाद सुरू झाला आहे.

नेटीजन्सच्या कमेंट्स

या व्हिडिओवर शेकडो कमेंट्स आल्या आहेत. अनेक सोशल मीडिया यूजर्सनी,महिलेची ती वक्तव्य असहिष्णू आणि प्रतिगामी म्हणत त्याचा निषेध केलाय. तर काहींनी असा युक्तिवाद केला की, एखाद्या मुलीची,तरूणीची संगत, तिच्या मैत्रिणी कोण, हा सार्वजनिक तपासणीचा विषय असू नये. या व्हिडिओवर शेकडो कमेंट्स आल्या आहेत.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.