AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Local shocker : लोकलमध्ये मयंकवर का केले वार ? पोलिसांनी दट्ट्या दाखवताच आरोपी रोशनचा थरकाप उडवणारा खुलासा

मुंबई लोकलमध्ये झालेल्या मयंक लोहार हत्याकांडाने खळबळ उडवली आहे. २३ जून रोजी पश्चिम रेल्वेच्या धावत्या लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून रोशन सुवर्णाने मयंकवर चाकूहल्ला केला. या हल्ल्यात मयंकचा मृत्यू झाला. पोलिसांनी २४ तासांत आरोपीला अटक केली असून, दारूच्या नशेत झालेल्या बाचाबाचीतून हा गुन्हा घडल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

Mumbai Local  shocker : लोकलमध्ये मयंकवर का केले वार ? पोलिसांनी दट्ट्या दाखवताच आरोपी रोशनचा थरकाप उडवणारा खुलासा
मुंबईत धावत्या लोकलमध्ये हत्याकांड
| Updated on: Jun 25, 2026 | 12:02 PM
Share

मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर मंगळवारी रात्री धावत्या लोकलमध्ये झालेल्या वादानंतर मयंक लोहार या तरूणाची हत्या झाली. आरोपी रोशन सुवर्णा याने वादानंतर धारदार चाकूने मयंकवर वार केले, तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. या हत्याकांडानंतर अवघ्या 24 तासांच्या आत मुंबई पोलिसांनी जंगजंग पछाडून आरोपी रोशन याला अटक केली. काल संध्याकाळी त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आणि बोरिवली जीआरपी ठाण्यात आणण्यात आलं. सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या रोशनने चौकशीत गुन्हा कबूल करत मयंकवर का वार केले, याची धक्कादायक कबुली दिली आहे.

काय आहे प्रकरण ?

मंगळवारी 23 जूनच्या रात्री पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते नालासोपारा फास्ट लोकलमध्ये रक्तरंजित हत्याकांड घडलं. मयंक लोहार या विरारमधील तरूणाचा खुन झाला. मयंक लोहार हा विरार परिसरात वास्तव्यास होता. तो अंधेरीच्या वेस्टसाईडमध्ये तो सेल्समन म्हणून काम करत होता. मंगळवारी रात्री तो अंधेरी येथे फर्स्ट क्लासच्या डब्यात चढला आणि विरारच्या दिशेन जात होता. त्यावेळी पाऊस येत होता म्हणून लोकलचा दरवाजा बंद करायला सांगितलं. याच कारणावरून मयंक आणि आरोपी रोशन सुवर्णामध्ये लवाद झाला. तो टोकाला पोहोचला आणि संतापलेल्या रोशनने बॅगेतून चाकू काढून मयंकचया अंगावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या मयंकचा गाडीतच मृत्यू झाला.

यानंतर लोकल बोरिवलीला थांबताच आरोपी ट्रेनमधून उतरून पसार झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तात्काळ ताब्यात घेऊन तपास यंत्रणांकडे सुपूर्द केले आणि मयंकचा शोध सुरू केला. अखेर त्याला काल संध्याकाळी अटक करण्यात आली.

मयंकला का मारलं ?

त्यानंतर पोलिसांनी आरोपी रोशन सुवर्णा याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. मयंकला का मारलं हेही त्याने सांगितंल. आरोपीच्या सांगण्यानुसार, घटनेच्या वेळी तो नशेत होता. त्या दिवशी त्याने बरीच दारू प्यायली होती. त्याच नशेत तो अंधेरीहून ट्रेन पकडून घरी जात होता. त्या रात्री मुसळधार पाऊस पडत असल्याने लोकलच्या डब्यातही पाणी आत येत होतं. त्यामुळे ट्रेनचा दरवाज बंद करण्याच्या मुद्यावरू आरोपी रोशन आणि मयंक यांचा वाद सुरू झाला.

त्यांच्या बाचाबाचीचं रुपांतर भांडणात झालं. रोशनच्या सांगण्यानुसार, रागाच्या भरात मयंकने त्याला ठोसा मारला, इतर प्रवाशांनीही मयंकची बाजू घेऊन मला मारहाण केली, असा दावा रोशनने केला. दारूमुळे आधीच चढलेली नशा आणि ट्रेनमधील लोकांमसोर झालेली मारहाण यामुळे रोशन प्रचंड संतापला, त्याचा ताबा सुटला आणि संतापाच्या भरात त्याने बॅगेत हात टाकून धारदार चाकू बाहेर काढला.

डोळ्याचं पात लवतं ना लवतं तोच , काही कळायच्या आत आरोपी करोशनने मयंक लोहारवर धारदार चाकूने वार केले. मयंकच्या छातीवर आणि पोटावर वार झाले आणि सगळीकडे रक्ताचा सडा पसरला. मयंक रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला आणि नंतर त्याचा ट्रेनमध्येच मृत्यू झाला.

Follow Us
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!