AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Local Shocker : अ‍ॅमेझॉनमधल्या मित्राने चाकू दिला, अचानक आठवलं… इंटरनेटवर काय पाहिलं? लोकल हत्याकांडातील धक्कादायक माहिती समोर

बोरीवली लोकल ट्रेनमध्ये शुल्लक वादातून एका प्रवाशाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ कारणावरून रोशन सुवर्णाने मयंक लोहारवर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली. पोलिसांनी आरोपी रोशनला पनवेलमधून अटक केली असून, त्याने मंगळूरला पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेने मुंबई हादरली.

Mumbai Local Shocker : अ‍ॅमेझॉनमधल्या मित्राने चाकू दिला, अचानक आठवलं... इंटरनेटवर काय पाहिलं? लोकल हत्याकांडातील धक्कादायक माहिती समोर
मुंबई लोकल हतयाकांड प्रकरणात मोठी अपडेट
| Updated on: Jun 26, 2026 | 11:59 AM
Share

लोकल ट्रेनचा दरवाजा बंद करण्यासारखा शुल्लक वादावरून एखाद्याचा जीव जाईल याची कोणी स्वप्नातही कल्पना केली नसेल. पण पश्चिम रेल्वे मार्गावर मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेने सगळेच हादरले. बोरीवली लोकल ट्रेनमध्ये रोशन सुवर्णा याचा मयंक लोहारशी वाद झाला आणि पाहता पाहता तो पेटला. रागाच्या भरात रोशन याने बॅगेतून चाकू काढला आणि मयंकच्या पोटावर, छातीवर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेला मयंक रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला आणि काही वेळातच मृत्यू झाला. या खुनानंतर फार झालेल्या रोशन सुवर्णा याला पोलिसांनी 24 तासांच्या पनवेलमधून अटक करत बेड्या ठोकल्या.

पोलिस चौकशीत अनेक महत्वाचे खुलासे झाले असून एक धक्कादायक अपडेटही समोर आली आहे. आरोपी रोशन याने मयंकवर ज्या चाकून वार केला, त्याला तो चाकू कुठून मिळाला, त्याच्या बॅगेत तो कसा आला याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. त्याबाबत रोशन याने स्वत: माहिती दिली आहे. रोशन सुवर्णा याला तो चाकू ॲमेझॉनमध्ये काम करणाऱ्या त्याच्या मित्राने दिला होता. काही दिवसांपूर्वी आरोपीच्या मित्राने घरकामासाठी म्हणून हा चाकू त्यावा दिला होता. मात्र आरोपीने तो बॅगेतच ठेवला आणि तो त्याबाबत विसरला. मात्र मंगळवारी रात्री वाद झाला त्यावेळी अचानक त्याला बॅगेत चाकू असल्याचे लक्षात आले. तोच चाकू त्याने बॅगेतून काढला आणि मयंकवर वार केले.

अशी पटली ओळख

हत्येनंतर आरोपी बोरिवली स्थाकात उतरून पसार झाला होता. सीसीटीव्हीत अनेक ठिकाणी तो दिसला, त्यानंकतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. रोशन याच्या शर्टवरील चिन्हाशिवाय अंधेरी आणि मिरा रोड रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजमधूनही पटली. त्यानंतर पोलिस हे मिरा रोड येथील आरोपीच्या घरी पोहोचले, तोपर्यंत तो घरातून फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबियांमारफकत आरोपीशी बोलणं केलं, त्यानंतरच त्याने शरण येण्यास होकार दिल्याची माहिती समोर आली.

हत्येनंतर मंगळूरूला पळून जाणार होता आरोपी

मुंबई लोकल ट्रेनमध्ये मयंकची हत्या केल्यानंतर आरोपी रोशन हाँ मंगळुरूला पळून जायच्या तयारीत होता , अशी माहिती पोलीस तपासात सदर माहिती उघडकीस आली . आरोपी रोशन सुवर्णाने मंगळुरूला पळून जाण्यासाठी बसचं तिकिटही काढलं होतं. मात्र त्याआधीच पोलिसांनी त्याचा तपासाची चक्र वेगाने फिरवत त्याला शोधून काढलं आणि पनवेल येथून अटक केली.

आरोपीने इंटरनेटवर काय केलं सर्च ?

तो पळून जाण्याआधी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. अटक झाल्यानंतर आरोपी रोशन याने पोलिसांना पहिला प्रश्न विचारला तो म्हणजे, मयंक जिवंत आहे का? त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असं पोलिसांनी सांगितलं. मात्र तरीही ारोपी रोश सुवर्णा याने इंटरनेटवर याबाबत सर्च केलं असता मयंकचा मृत्यू झाल्याचं त्याला समजलं. मात्र ही बातमी चुकीची आहे, असं पोलिसांनी त्याला सांगितलं. आरोपीने गोंधळून जाऊन चुकीचं काही करू नये यासाठी पोलिसांनी ही खबरदारी घेतल्याचं दिसून आलं. अखेर त्याला बोरिवली पोलिस स्टेशनला आणल्यावर पोलिसांनी त्याला मयंकचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.

Follow Us
सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना मोदींची गद्दारांशी भेट का?
Uddhav Thackeray | सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना मोदींची गद्दारांशी भेट का? उद्धव ठाकरे यांचा सवाल
राष्ट्रवादीत मोठा बदल होणार? सुनेत्रा पवार- प्रशांत किशोर भेटीबाबत...
राष्ट्रवादीत मोठा बदल होणार? सुनेत्रा पवार- प्रशांत किशोर भेटीबाबत बड्या नेत्याचं मोठं विधान
फेसबुकवरून सरकार चालत नाही म्हणायचे, आता इन्स्टाग्रामवरून देश चालवतात!
Uddhav Thackeray | फेसबुकवरून सरकार चालत नाही म्हणायचे, आता इन्स्टाग्रामवरून देश चालवतात!; उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
ही वादळापूर्वीची शांतता, नंतर... उद्धव ठाकरे एका वाक्यातच म्हणाले
ही वादळापूर्वीची शांतता, नंतर... उद्धव ठाकरेंनी एका वाक्यातच दिली कोर्टातील सुनावणीबाबत मोठी प्रतिक्रिया
आयुष्यात कोणताही ठराविक कोर्स... PM मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
PM Narendra Modi Live: आयुष्यात कोणताही ठराविक कोर्स... IIT दिल्लीत पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
उमेश पाटलांच्या एका पोस्टने वाढवलं राष्ट्रवादीचं टेन्शन
Umesh Patil on NCP | दादांनी उभ्या केलेल्या पक्षाच्या फांदीवर कुऱ्हाड चालवण्यात...; उमेश पाटलांच्या एका पोस्टने वाढवलं राष्ट्रवादीचं टेन्शन
शरद पवार गटाची मोठी खेळी? सुळे यांच्या नेतृत्वात सर्व खासदार...
मोठी बातमी! शरद पवार गटाची मोठी खेळी? सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात सर्व खासदार पंतप्रधानांच्या भेटीला; घेणार मोठा निर्णय!
दिलगीरी ट्वीट नंतर मी सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क करण्याचा...
Harshwardhan Sapkal | दिलगीरी ट्वीट नंतर मी सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र... सपकाळ नेमकं काय म्हणाले?
प्रदेशाध्यक्ष बदलावा ही अजितदादांचीच इच्छा होती...
Rupali Thombre Patil | प्रदेशाध्यक्ष बदलावा ही अजितदादांचीच इच्छा होती; रुपाली ठोंबरे यांच्या दाव्याने राष्ट्रवादीत खळबळ!
दादांच्या मृत्यूनंतर आमदारांना फोन, इकडे मुखाग्नी दुसरीकडे मंत्रीपद...
दादांच्या मृत्यूनंतर आमदारांना फोन, इकडे मुखाग्नी दुसरीकडे मंत्रीपदासाठी... NCP तील नेत्याने अखेर सांगितलंच