AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Shocking : बायकोबद्दल सारखा तोच विचार डोक्यात येत होता, अखेर नवऱ्याचा कथित बॉयफ्रेंडच्या गुप्तांगावर ब्लेड हल्ला, मुंबईतली घटना

नवऱ्याने कथित बॉयफ्रेंडच्या गुप्तांगावर ब्लेड हल्ला केल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या मालाडमध्ये ही घटना घडली.

Mumbai Shocking : बायकोबद्दल सारखा तोच विचार डोक्यात येत होता, अखेर नवऱ्याचा कथित बॉयफ्रेंडच्या गुप्तांगावर ब्लेड हल्ला, मुंबईतली घटना
mumbai news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 25, 2026 | 9:27 AM
Share

गोविंद ठाकूर : मुंबईच्या मालाडमधून खळबळजनक घटना समोर आली आहे. बायकोशी शारीरिक संबंध ठेवल्याचा संशयाने पती आणि मुलाने हादरवणारं कृत्य केल्याचं समोर आलं आहे. दोघांनी बायकोच्या कथित बॉयफ्रेंडच्या गुप्तांगावर ब्लेडने हल्ला केल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील मालवणी भागातील या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या मालाडमधील मालवणीत एका संशयातून खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. 50 वर्षीय कालिदास आणि त्याचा मुलगा यागेश याने एका 32 वर्षीय रिक्षा चालकावर हल्ला केला. बायकोशी शारीरिक संबंध असल्याच्या संशयावरून मुलाच्या मदतीने कालिदासने 32 वर्षीय गणेश सक्सेना याच्या गुप्तांगावर हल्ला केला. या प्रकरणी कालिदास आणि त्याचा मुलगा योगेशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षा चालक गणेशने दोघांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

नेमकं काय घडलं?

तू माझ्या पत्नीसोबत (Wife) शारीरिक संबंध ठेवतो, असा आरोप कालिदासने केला. या आरोपांनंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. कालिदासचा मुलगा योगेश याने तक्रारदार गणेश याचे कपडे काढले. कालिदासने गणेशच्या गुप्तागांवर ब्लेडने हल्ला केला. तक्रारदार गणेश यांनी स्वतःची सुटका करत थेट रुग्णालय गाठले आणि त्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.

मालवणीत ड्रग्ज विक्रेता पोलीस कर्मचारी

तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) नावाला काळिमा फासणारा प्रकार घडला. ड्रग्ज तस्करी प्रकरणात मुंबई पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याला टक करण्यात आली. किरण इंदुलकर असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मालवणीच्या पोलिसांनी त्याला ड्रग्ज विक्री करताना रंगेहाथ पकडलं. किरण हा जोगेश्वरीमधील पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्याआधी तो मालवणीमध्येही कार्यरत होता. त्यावर पोलिसांचा ड्रग्जची विक्री करण्याचा संशय होता. त्यानंतर त्यानंतर मालवणी पोलिसांनी ड्रग्ज विक्री करताना रंगेहाथ पकडलं. त्याच्याकडे मेफेड्रोन नावाचे अंमली पदार्थ आढळून आले. या घटनेने मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला तडा गेला आहे.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु